spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Har Har Mahadev झी मराठी वाहिनीला स्वराज्य संघटनेचा अखेरचा इशारा, वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करण्यास नकार

“हर हर महादेव (Har Har Mahadev ) हा चित्रपट थिएटरमध्ये बंद पडल्यानंतर आता १८ डिसेंबर रोजी झी मराठी (Zee Marathi) या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत स्वराज्य संघटनेने झी स्टुडीओला पत्र लिहून सूचित केले आहे. या सूचनेकडे कानाडोळा करून हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल, इशारा संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी दिला होता.

हेही वाचा : 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणी, दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत गृहमंत्री यांची घेणार भेट

या चित्रपटास संभाजीराजे छत्रपती यांच्यानंतर स्वराज्य संघटनेसह (Swarajya Sanghatana) राज्यभरात अनेक स्तरांतून विरोध झाला होता. त्यामुळे हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, असे पत्र संभाजीराजे छत्रपती यांनी झी स्टुडिओच्या व्यवस्थापनास दिलेले होते. पण अजूनही झी मराठी वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याची जाहिरात दाखविली जात आहे.

आज १४ डिसेंबर २०२२ स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी श्री विनोद साबळे आणि श्री अंकुश कदम यांनी झी स्टुडीओच्या (Zee Studio) ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जाऊन व्यवस्थापनास इशारा दिलेला आहे. हर हर महादेव हा चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याची लेखी हमी त्यांनी मागितली असून, छत्रपती संभाजीराजे यांचे पत्र आणि समस्त शिवभक्तांच्या भावनेकडे दुर्लक्ष करून चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्यास झी स्टुडीओ व्यवस्थापन जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

तांब्याच्या भांड्यातील पाणी हिवाळ्यात का फायद्याचे आहे घ्या जाणून

अभिजीत देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून तयार झालेला आणि झी स्टुडिओची निर्मिती असलेला हा चित्रपट चुकीच्या इतिहासावर आधारित असल्याचा दावा अनेकांकडून करण्यात आला. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात, इतिहासाची चेष्टा केली आहे. शूरवीरांच्या कर्तुत्ववावर खोडसाळ पणा केला आहे. इतिहासाची पूर्ण मोडतोड केली आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा अपमान केला आहे. असे म्हणत नेत्यांनी आणि काही सामाजिक संघटनांनी या चित्रपटाला कायम विरोध केला आहे.

भारतीय पासपोर्ट तीन वेगवेगळ्या रंगांचे का असतात ? जाणून घ्या पासपोर्टच्या रंगाचा अर्थ

Latest Posts

Don't Miss