spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

युट्युब स्टार भुवन बाम आता OTT वर दिसणा , ‘ताझा खबर’ या सिरीजमधून करणार पदार्पण

भुवन बाम (Bhuvan Bam) हा खूप मोठा युट्युब स्टार आहे. आपल्या देशात असे क्वचितच लोक असतील ज्यांना भुवन बाम कोण आहे हे माहित नसेल. भुवन बामचे चाहते हे भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात विखुरलेले आहेत. तर भुवन बाम हा त्याच्या बीबी की वाइन्स (bibi ki vines)या युट्युब शोमुळे कायम चर्चेत असतो.अनेक वेळा नेटकरी त्याच्या या शोमधील संवादांचा रिलमध्ये किंवा मिम्स मध्येही वापर करतात. तर आता भुवन हा त्याच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आला आहे. युट्युब स्टार भुवन बाम हा आता OTT प्लायफॉर्म मध्ये पदार्पण करणार आहे. भुवन हा ‘ताझा खबर'(Taaza Khabar) या नवीन सिरींजच्या माध्यमातून OTT मध्ये पदार्पण करणार आहे. या सिरींमध्ये भुवन बाम हा आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

युट्युब स्टार भुवन बाम हा भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय युट्युब कलाकारांपैकी एक आहे, तर भुवन हा एक उत्कृष्ठ गायक देखील आहे. भुवन बामच्या ‘बीबी की वाइन्स’ या युट्युब शो मुळे त्याला प्रचंड मोठ्याप्रमाणात प्रसिद्धी मिळाली. भुवनने या शो च्या माध्यमातूम आणि त्याच्या अभिनयाने व विनोदाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यानंतर भुवन बामने ‘ढिंढोरा’ (Dhindora) ही छोटीशी मालिकाही सुरु केली होती. या त्याच्या मालिकेलाही प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून सोशलमिडीयावर चर्चा सुरु होती की अभिनेता भुवन बाम हा सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. याबद्दल भुवनाने सुद्धा एका कार्यक्रमात त्याची सिनेसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण आता भुवनने थेट OTT मध्येच पदार्पण केलं आहे. भुवन हा डिस्नी प्लस हॉटस्टार मधील ‘ताझा खबर’ या त्याच्या आगामी सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आह. तर त्याच्या बरोबर या सिरीजमध्ये श्रीया पिळगांवकर, देवेन भोजानी, नित्य माथूर, प्रथमेश परब, अतिश नाईक, शिल्पा शुक्ल हे देखील दिसणार आहेत.

नुकतंच या सिरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर नुसार या मालिकेत भुवन हा वसंत गावडे नावाच्या माणसाची भूमिका साकारत आहे. आणि हा माणूस या सिरीजमध्ये सार्वजनिक शौचालयाचा मालक आहे.सर्वांप्रमाणेच या माणसांचेही श्रीमंत होण्याचे स्वप्न असत त्यामध्ये एक दिवस त्याला असे काही सापडत की जे त्याच आयुष्यच बदलून टाकत. तर आपल्या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे विनोद करणारा भुवन या सिरीजमध्ये अ‍ॅक्शन सीक्वेन्स करताना दिसत आहे.

भुवन बाम आणि रोहित आणि रोहित राज हे या सीरिजचे निर्माते आहेत. बीबी की वाइन्स प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली या सिरींजची निर्मिती करण्यात आली आहे. ही मालिका हिमांक गौर यांनी दिग्दर्शित केली आहे, ज्याने भुवनची यूट्यूब मालिका धिंडोरा दिग्दर्शित केली होती.

हे ही वाचा : 

RBI माजी गव्हर्नर रघुराम राजन राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणी, दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत गृहमंत्री यांची घेणार भेट

तांब्याच्या भांड्यातील पाणी हिवाळ्यात का फायद्याचे आहे घ्या जाणून

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss