spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दिल्लीत पुन्हा अत्याचाराला बळी पडली तरुणी, अ‍ॅसिडने हल्ल्यानंतर स्थानिक प्रशासनाला आली जाग

दिल्लीत इयत्ता १२वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अ‍ॅसिड हल्ला (Acid attack) झाल्याची अत्यंत भयावह आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. देशाची राजधानी दिल्लीच्या द्वारका मोड भागात झालेल्या या घटनेत पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. या विद्यार्थ्याला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी नऊच्या सुमारास ही बाब त्यांना कळवण्यात आली आणि मोहन गार्डन परिसरात पीडितेवर हल्ला करण्यात आला.सकाळी नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पीडितेला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, “आमची धाकटी मुलगी धावत घरात आली आणि म्हणाली की तिच्या बहिणीवर अॅसिड फेकले गेले आहे. दोन्ही मुलांनी तोंड झाकले होते, त्यांची ओळख पटलेली नाही. तिच्या दोन्ही डोळ्यांमध्ये अॅसिड घुसले आहे,” असे पीडितेच्या वडिलांनी सांगितले.

पोलिसांनी (Delhi Police) पुढे सांगितले की, घटनेच्या वेळी मुलगी तिच्या लहान बहिणीसोबत होती. त्यांच्या ओळखीच्या दोन व्यक्तींवर तिचा संशय बळावला आहे. यापैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. दिल्लीत अॅसिड हल्ल्याची बातमी वणव्यासारखी पसरली. अॅसिड हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाचे कर्मचारी कामाला लागले. दरम्यान, दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांनी अल्पवयीन मुलीवर अॅसिड फेकणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. “हे अजिबात सहन होत नाही. आरोपींना एवढी हिंमत कशी जमली? आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. दिल्लीतील प्रत्येक मुलीची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे, असे केजरीवाल यांनी हिंदीत ट्विट केले.

Latest Posts

Don't Miss