spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लिओनेल मेसीचा मोठा निर्णय, फुटबॉल विश्वात एकच चर्चेला उधाण

फिफा वर्ल्डकप २०२२च्या (FIFA World Cup 2022) पहिल्या सेमी फायनल सामन्यात अर्जेंटिनाने (Argentina) झुंजार क्रोएशियाचा ३ – ० असा पराभव केला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचा (Lionel Messi) हा शेवटचा वर्ल्डकप असल्याचे बोलले जात आहे. या शेवटच्या वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिना अंतिम (Argentina final) फेरीत पोहचली. यानंतर मेस्सीने अर्जेंटिनाच्या वृत्त संस्थेशी बोलताना आपल्या निवृत्तीबाबत एक मोठे वक्तव्य केले.

“ही कामगिरी केल्याचा मला आनंद आहे. अंतिम सामना खेळत माझा वर्ल्डकपमधील प्रवास संपत आहे याचा मला आनंद आहे,” असं मेसीने अर्जेटिनामधील Diario Deportivo Ole या वृत्तसंस्थेशी बोलताना दिला आहे. “पुढील स्पर्धेसाठी बरीच वर्षं शिल्लक असून, मला ते शक्य होईल असं वाटत नाही. अशाप्रकारे शेवट होणं हेच सर्वोत्तम आहे,” असं मेसीने सांगितलं आहे. क्रोएशिया (Croatia) विरोधातील विजयानंतर मेसीने संघातील खेळाडूंना या क्षणाचा आनंद घ्या असं म्हटलं. “अर्जेंटिना पुन्हा एकदा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत आहे, आनंद लुटा,” असं त्याने सहकाऱ्यांना सांगितलं.

मेस्सी वैयक्तिक रेकॉर्डबद्दल (record) बोलताना म्हणाला की, ‘रेकॉर्ड्स खूप चांगले आहेत मात्र सांघिक उद्दिष्ट साध्य करणे हे त्यापेक्षाही महत्वाचे आहे. आमच्या दृष्टीने ही सर्वात सुंदर गोष्ट आहे. आम्ही फक्त एक पाऊल मागे आहोत. आम्ही सर्वस्व पणाला लावून लढलो आहे. यावेळी वर्ल्डकप जिंकण्यासाठी आम्ही सर्व काही पणाला लावू.’

हे ही वाचा : 

विवेक अग्निहोत्रींनी पठाण चित्रपटातील ‘या’ गाण्याच्या केलेल्या टिपण्णीवर, शाहरुखचे चाहते झाले नाराज

दिल्लीत पुन्हा अत्याचाराला बळी पडली तरुणी, अ‍ॅसिडने हल्ल्यानंतर स्थानिक प्रशासनाला आली जाग

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss