spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Christmas 2022 ख्रिसमस स्पेशल घरच्या घरी बनवा रवा केक

Christmas Special : डिसेंबर म्हणजे ख्रिसमसचा महिना डिसेंबर महिन्यात बाजारात ख्रिसमसच्या निमित्ताने बाजारपेठा सजलेल्या असतात. केक, कुकीज, चॉकलेटस, गिफ्टस ही या महिन्याची स्पेशालिटी असते. तसेच ख्रिसमसच्या निमित्ताने केकला देखील खूप महत्व असते. ख्रिसमस Christmas हा सण ख्रिश्चन लोक नाहीतर बाकी धर्माचे लोक देखील साजरा करतात. ख्रिसमस आणि नवीन वर्षाची सुरुवात केक पासूनच करतात. नाताळ म्हटल्यावर सर्व गोष्टी मार्केट मध्ये महाग मिळतात , त्याच बरोबर केक देखील महाग मिळतात. अशावेळी घरच्या घरी तुम्ही मऊ आणि लुसलूशीत केक बनवू शकता. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून रवा केक semolina cake कसा बनवायचा या बद्दल सांगणार आहोत.

साहित्य :

बारीक रवा – २ वाटी

ताजे दही – १ वाटी

पिठीसाखर – १ वाटी

दूध – १ वाटी

तूप – पाव वाटी

व्हॅनिला इसेन्स – अर्धा चमचा

ड्रायफ्रूट आणि टूटीफ्रूटी – आवडीनुसार

बेकिंग पावडर – १ चमचा

बेकिंग सोडा – १ चमचा

 

कृती :

सर्व प्रथम एका बाऊलमध्ये तूप घालून घ्या आणि त्यामध्ये साखर घालून घ्या आणि मिश्रण चांगले एकत्रित करून घ्या आणि परत एकदा मिश्रण फेटाळून घ्या.

मिश्रण फेटाळून झाल्यानंतर त्यामध्ये रवा आणि दही घालून घ्या मिश्रण परत एकदा एकत्रित करून घ्या.

मिश्रण एकत्रित झाल्यानंतर त्यामध्ये दूध व्हॅनिला इसेन्स घालून घ्या परत मिश्रण एकजीव करून घ्या आणि एकजीव झाल्यानंतर त्यावर झाकण ठेऊन द्या किमान अर्धा तास तरी झाकन ठेऊन द्या.

कुकरमध्ये मीठ किंवा बेकिंग सोडा घालून घ्या आणि त्यावर डीश ठेवून घ्या. नंतर केकचे भांडे ठेऊ द्या आणि किमान कुकर १० मिनीटे प्री हीट करुन घ्या.

झाकलेल्या मिश्रणामध्ये बेकींग सोडा बेकींग पावडर घालून घ्या आणि मिश्रण एकत्रित करून घ्या.

गरजेनुसार काजू बदाम घालून घ्या.

कुकरच्या भांड्याला तेल लावून घ्या.

प्रीहीट कुकरमध्ये ३५ ते ४० मिनिटे भांडे ठरू द्या.

आणि खाण्यासाठी रवा केक semolina cake तयार आहे.

हे ही वाचा : 

उपवासाठी खास ३ प्रकारचे पदार्थ; जाणून घ्या रेसिपी…

 

 

Latest Posts

Don't Miss