spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मराठी – कानडी भाषेतील प्रेमकहाणी १८ जुलै पासून प्रेक्षकांचा भेटीला

'जीवाची होतीय काहिली' हे नाव मालिकेचे असून ही मालिका मराठी आणि कानडी या दोन भाषांमधील प्रेमकहाणी आपल्याला पाहायला मिळणार.

मुंबई : येत्या 18 जुलैपासून प्रेक्षकांना एक नवी मालिका पाहायला मिळणार आहे. ‘जीवाची होतीय काहिली’ हे नाव मालिकेचे असून ही मालिका मराठी आणि कानडी या दोन भाषांमधील प्रेमकहाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिकेतुन आपल्यासमोर दोन दिग्ग्ज अभिनेते समोरासमोर येणार आहे.

याआधी आपण मोठ्या पडद्यावर विविध भाषिकांची प्रेम कहाणी पाहिली आता तोच अनुभव आपल्याला छोट्या पडद्यावर देखील अनुभवायला मिळणार आहे. विद्याधर जोशी यांचा अस्सल कोल्हापुरी वेश तर अतुल काळे यांचा कर्नाटकी पेहराव प्रेक्षकांना आवडतो आहे. कन्नड आणि मराठी एकाच छताखाली कसे राहणार, हा विषय अगदी मनोरंजनाचा विषय ठरणार आहे.

विद्याधर जोशी आणि अतुल काळे यांची केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळणार असून त्यांच्यातील छोटी, मोठी भांडणं आणि घरातल्या घरातच मारली जाणारी रेखा, प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. भांडणातून रेवती आणि अर्जुन यांचा नात्यावर होणारा परिणाम, त्यातून हळुवार खुलणार प्रेम, भाषेचा एक वेगळा बाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सीमा देशमुख, भारती पाटील विद्याधर जोशी, आणि अतुल काळे यांच्या सोबतीने ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करणार यात काही शंका नाही.

Latest Posts

Don't Miss