spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अभिनेता वरुण धवनला कानाशी निगडित ‘व्हेस्टिब्युलर हायपोफंक्शन’ आजाराशी देतोय झुंज, जाणून घ्या या आजाराविषयी माहिती

अभिनेता वरुण धवनला कानाशी निगडित व्हेस्टिब्युलर हायपोफंक्शन (vestibular hypofunction)आजार झाल्याचे नुकतेच त्याने जाहीर केले. कानाचा संबंध केवळ ऐकण्याची असतो, इतकेच आपल्याला ज्ञात आहे. या सोबतच व्हेस्टिब्युलर संस्थाही चालविण्याचे काम कानाद्वारे केले जाते याबाबत अधिक माहिती समजून घेऊया…
कानाच्या रचनेनुसार त्याचे बाहेरचा कान, मधला कान आणि आतला कान असे तीन भाग आहेत. यातील आतला हा खूप आत- म्हणजे मेंदूच्या जवळ असतो. या आतल्या कानाला काही दुखापत झाली की कान स्वत:च आवाज करायला सुरूवात करतो. आतल्या कानात ऐकण्याचा आणि शरीराचा तोल सांभाळण्याचा असे दोन अवयव असतात. शरीराचा तोल सांभाळणाऱ्या संस्थेला व्हेस्टिब्युलर सिस्टम असे म्हणतात. ही सिस्टम नीट काम करत नसल्यास व्हेस्टिब्युलर हायपोफंक्शन असे म्हटले जाते. या आजाराची लक्षणे आणि उपचाराविषयी माहिती दिली आहे डॉ. अंकित जैन यांनी.

लक्षणे

व्हेस्टिब्युलर संस्था योग्यरितीने काम करत नसल्यास रुग्णाला शरीराचा तोल जाणे, चक्कर येणे ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. यामुळे डोक्याच्या एका किंवा दोन्ही बाजूवर परिणाम होऊ शकतो. लक्षणे समस्येच्या कारणावर अवलंबून असतात आणि भिन्न असतात. तसेच ही लक्षणे अचानक किंवा हळूहळू येऊ शकतात सौम्य किंवा गंभीर असू शकतात किंवा काही दिवस ते अगदी काही आठवड्यापर्यत राहू शकता. सर्वसामान्यपणे पुढील लक्षणे दिसून येतात.

• चक्कर येणे किंवा चक्कर येणे

• खराब संतुलन, विशेषत: डोके वळणे

• चालताना त्रास होतो, विशेषत: घराबाहेर, गडद खोल्यांमध्ये किंवा आत गर्दीची ठिकाणे

• अस्पष्ट दृष्टी, विशेषत: डोके पटकन फिरवताना

• तीव्र आणि गंभीर स्वरुपाच्या आजारामध्ये मळमळ आणि उलट्या होणे

हेही वाचा : 

विवेक ओबेरॉयने केला धक्कादायक खुलासा, म्हणाला ‘मी आत्महत्या करण्याचा विचार करत होतो…’

उपचार कोणते ?

फिजिकल थेरपी हा एक प्रभावी उपाय आहे. कानातील समस्या दूर करण्याच्या कामी मेंदूला प्रशिक्षित करता येते. याला ‘व्हेस्टिब्यूलर रीहॅबिलिटेशन’ असे म्हणतात. म्हणजेच कानातील तोल सांभाळणाऱ्या यंत्रणेचे एक प्रकारे पुनर्वसन. विशिष्ट प्रकारच्या व्यायामांच्या आधारे मेंदूचे हे प्रशिक्षण करताकरता येते. अर्थात हे व्यायाम प्रत्येकाच्या समस्येनुसार वेगवेगळे असतात आणि ते सुरू केल्यावर त्याचा चुटकीसरशी परिणाम दिसला असे होत नाही. त्याला काही वेळ द्यावा लागतो व त्यामुळे आजार बरा होऊ शकतो. या व्यायामांच्या चार ते पाच पायऱ्या आहेत. साधारणत: दररोज एक ते दीड मिनिटे असा पाच वेळा असा सुचवलेला व्यायाम केला की कानाची तक्रार दूर करण्यासाठी मेंदूचे प्रशिक्षण सुरू होते. दहा ते बारा आठवडय़ांत त्याने फरक पडू शकतो.

डॉ. अंकित जैन

Latest Posts

Don't Miss