spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

fatigue कामाच्या धावपळीत थकवा जाणवत असेल, तर ‘या’ गोष्टी सोबत ठेवा

fatigue : आजकालच्या जीवनशैलीमुळे जास्त प्रमाणात थकायला होते. आणि त्यामुळे आजारी पडायला देखील होते. थकव्यामुळे fatigue सकाळी लवकर उठायला देखील होत नाही. आणि फ्रेश देखील वाटत नाही. त्यामुळे कोणत्याही कामात मन लागत नाही, दिवसभर ऑफिसचं काम, प्रवासाचा ताण अश्या अनेक कारणांनी आपले शरीर आणि मन दोन्ही थकून जाते. शरीराला पुरेसा आराम जरी मिळाला तरीही थकवा जात नाही. काही आजार असल्यास आपल्याला जास्त थकवा जाणवतो. तर आज आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून थकवा जाणवल्यास कोणत्या गोष्टी सोबत ठेवणे.

शरीर निरोगी राहण्यासाठी ऊर्जा खूप महत्वाची आहे. शरीरात जर ऊर्जा जास्त काळ टिकून राहिली तर आपण कोणत्याही प्रकारची कामे करू शकतो. आणि शरीरातील ऊर्जेची पातळी कमी झाल्यास थकवा जास्त जाणवतो. अनेक वेळा जास्त प्रमाणात देखील थकवा (fatigue) लागतो. कधी कधी शाररिक हालचालीमुळे देखील आपल्याला थकवा जाणवतो. शरीरात ऊर्जा जास्त काळ ठिकवण्यासाठी आणि थकवा लागू नये म्हणून काही गोष्टीचा समावेश आहारामध्ये करणे. काम करताना कधी कधी धावपळीत देखील थकवा जाणवतो. तर या गोष्टी तुम्ही तुमच्या सोबत ठेवणे गरजेचे आहे.

 

शरीरातील थकवा घालवण्यासाठी तुम्ही केळीचा समावेश करा. केळीचा नियमित पणे समावेश केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. केळीमध्ये (banana) व्हिटॅमिन बी (Vitamin B) , फायबर (fiber) आणि पोटॅशियम (Potassium) जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे शरीरात ऊर्जा जास्त काळ टीकून राहते आणि थकवा देखील जाणवत नाही, यामुळे केळीचे नियमित पणे सेवन करणे.

कमी प्रमाणात पाणी पिल्याने देखील थकवा जाणवतो. शरीरात ऊर्जा जास्त काळ टिकवण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी सेवन करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर
तुम्ही फळाचे देखील सेवन करू शकता फळांमध्ये देखील मिनरल्स आणि व्हिटॅमिन आढळून येते. हंगामी फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असते जे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते.

जर तुम्हाला थकव्यामुळे अचानक मध्ये चक्कर आली तर तुम्ही लिंबू पाणीचे सेवन करू शकता. लिंबू पाणी मध्ये गरजेनुसार साखर आणि मीठ घालून घेणे. त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि थकवा देखील जाणवणार नाही.

हे ही वाचा : 

चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

 

 

Latest Posts

Don't Miss