spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maha Vikas Aghadi Morcha राष्ट्रवादीकडून हल्लाबोल महामोर्चात ठाण्यातून दहा हजार कार्यकर्ते होणार सहभागी

महापुरुषांचा वारंवार केला जाणारा अवमान, महाराष्ट्रातील उद्योगांची पळवापळवी, राज्यातील बेरोजगारी या निषेधार्थ महाविकास आघाडीने येत्या १७ डिसेंबर रोजी महामोर्चाचं आयोजन केलं आहे. या महामोर्चामध्ये (Maha Vikas Aghadi Morcha) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मा. मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी दिली.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा, नुकसान भरपाईत मोठी वाढ

महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले अनेक उद्योग परराज्यात विशेषतः गुजरातला नेले जात आहेत. ज्या उद्योगांमुळे महाराष्ट्रातील तरूणांना रोजगार मिळणार होता, असे उद्योग परराज्यात जात असतानाही सरकार ढिम्म आहे. तसेच, राज्यपालांसह सरकारमधील अनेक जबाबदार मंत्री महापुरुषांचा अवमान करीत आहेत. हा अवमान महाराष्ट्र या पुढे सहन करणार नाही, हा संदेश देण्यासाठीच हा महा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे, येत्या १७ तारखेचा हा मोर्चा केवळ राजकीय पक्षाचा नसून महाराष्ट्र प्रेमीनी महाराष्ट्रद्रोहींविरोधात केलेला एल्गार आहे. या मोर्चासाठी ठाण्यातून सुमारे दहा हजार कार्यकर्ते सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत, असेही आनंद परांजपे यांनी सांगितले.

‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेतील शेवंता करणार या दिग्दर्शकाशी लग्न , हळदीचे फोटो झाले व्हायरल

दरम्यान, महाविकास आघाडीच्या या मोर्चाची भायखळा येथील रिचर्डस एण्ड क्रूडास येथून सुरूवात होणार असून बृहन्मुंबई महानगर पालिकेसमोर मोर्चाचा समारोप होणार आहे. या मोर्च्यात शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाई जगताप आणि इतर नेते उपस्थित असतील. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार,सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि शरद पवार सुद्धा येण्याची शक्यता आहे. डावे पक्ष सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहेत.

केंद्रात भाजपा सरकार आल्यापासून देशात ड्रग्जच्या तस्कारीत वाढ, नाना पटोलेंच्या आरोप

Latest Posts

Don't Miss