spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Shubman Gil शुभमन गिलने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले, सोशल मीडियावर चाहत्यांचे प्रेम

अखेर शुभमन गिलची प्रतिक्षा संपली आणि त्याला प्रगतीची वाट दिसली आहे. चटोग्राम कसोटीच्या दुसऱ्याडावात भारताच्या या सलामीवीराने शानदार शतक ठोकलं आहे. शुभमन गिलने आपल्या कसोटी क्रिकेटच्या करीअरमधील पहिलं शतक लगावलं. याआधी शुभमन गिलची (Shubman Gil) ब्रिसबेनमध्ये कसोटी शतकाची संधी हुकली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये तो ९१ रन्सवर आऊट झाला होता. आज चटोग्राम टेस्टमध्ये तो नर्वस नाइंटीजला बळी पडला नाही. त्याने शतक झळकवून विश्वास सार्थ ठरवला. शुभमन गिलची प्रतिक्षा तब्बल ७०० दिवसानंतर संपली आहे.

हेही वाचा : 

HallaBol Morcha मविआच्या मोर्चाविरोधात भाजपाचे आंदोलन म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’, नाना पटोलेंची टीका

शुभमन गिलने आतापर्यंत भारताकडून एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळले आहे. त्याने अद्याप टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. गिलने आतापर्यंत १२ कसोटी सामन्यांच्या२३ डावांमध्ये ३३.७६ च्या सरासरीने ७०९ धावा केल्या आहेत. त्याच्या खेळीत १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. १५ एकदिवसीय सामने खेळताना त्याने ५७.२७ च्या सरासरीने ६८७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये गिलची सर्वोच्च धावसंख्या १३० धावा आहे.

हिंदू समाजासह मुस्लिम समाजाकडूनही ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार घालण्यात आला

Latest Posts

Don't Miss