spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘मविआ’च्या महामोर्चासाठी पैसे देऊन गर्दी जमवली, व्हिडीओ शेअर भाजपने केला गंभीर आरोप

काल महाविकस आघडीकडून (Maha Vikas Aghadi) मुंबईत भाजप सरकार विरोधात महमोर्चा (Maha Morcha) काढण्यात आला. या महमोर्चामध्ये महाविकास आघाडीचे सर्व जेष्ठ नेते उपस्थित होते तर महाविकास आघाडीचे राज्यभरातील सर्वच समर्थक आणि कार्यकर्ते या महामोर्चात उपस्थित होते . या मोर्च्यात शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , अजित पवार (Ajit Pawar) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. मोर्च्यात उपस्थित असलेले कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत माविआ नेत्यांना सहकार्य करताना दिसले. पण आता भाजप (BJP) कडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या आधारावर भाजपकडून माविआ वर आरोप करण्यात येत आहे. महामोर्च्यात मविआ कडून पैसे देऊन गर्दी जमवण्यात आली होती असा आरोप केला जात आहे.

काल माविआकडून मुंबईत भाजप सरकार विरोधात हल्लाबोल मोर्चा (Halla Bol Morcha) काढण्यात आला होता. भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आलेल्या महापुरुषांवरील आक्षेपार्ह्य वक्तव्याच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. माविआ ने आयोजित केलेल्या या हल्लाबोल महामोर्च्यामध्ये अनेक माविआ समर्थक आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. तर आता या मोर्चाला जमलेल्या गर्दीवर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी एक व्हिडीओ ट्विट करत माविआ वर पैसे देऊन गर्दी जमावल्याचा आरोप केला आहे. केशव उपाध्ये यांनी त्यांच्या ट्विटमध्ये असे लिहिला आहे ‘की मुंबईतील पत्रकार संघाच्या जवळ असलेल्या कॅाग्रेस कार्यालयाजवळ आज मोर्चा सुरू असतानाचे दृश्य आज मविआ मोर्चात थोडीफार लोक जमली ती सुध्दा अशा पध्दतीने’ असे केशव उपाध्ये यांनी लिहिले आहे.

या व्हिडिओत एक व्यक्ती काही लोकांना पैसे वाटप करताना दिसत आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या व्हिडिओबाबत वक्तव्य केला आहे. की हे खूप लाजिरवाणे आहे, मोर्चात आलेल्या लोकांना आपण का आलो हे माहीत नाही. कोणत्या पक्षाचा मोर्चा आहे हे माहित नाही. पैसे वाटले जात आहेत आणि एवढं सगळं करूनही ते संख्या जमवू शकले नाही. त्यामुळे जनतेला काय हवं आहे हे आज दिसून आले आहे. जनतेला ही माहित आहे की हे फक्त राजकारणासाठी महापुरुषांच्या नावाने राजकारण करत आहे. नॅनो मोर्चा निघाला त्यामुळे मुंबईत कोणाची ताकद आहे हे दिसून आले आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

पुरणपोळी बनवायला शिकत आहात ? तर ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

Latest Posts

Don't Miss