spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री शिंदेची खुर्ची जाणार का ?, चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं सुचक वक्तव्य

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भुकंप होणार असल्याचे दिसून आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर आता जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे ते चर्चेत आले आहे.

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भुकंप होणार असल्याचे दिसून आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर आता जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे ते चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण एका वेगळ्या दिशेनं चालल्याचा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. त्यावर आता बावनकुळेंनी दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.बावनकुळेंच्या त्या वक्तव्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहे. तसेच माझ्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे असेही चंद्रचेखर म्हटले. बावनकुळे यांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जातीपातीच्या बाहेर निघालेले नेते आहेत. न्यायासाठी आलेल्या प्रत्येकाला त्यांनी मदत केली आहे. जो जो समाज त्यांच्याकडे गेला. त्याच्यासाठी त्यांनी काम केलं आहे. मराठा असतील, धनगर असतील, ओबीसी असतील, सर्वांसाठी त्यांनी काम केलं. त्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी आहे की ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजे असे स्पष्ट वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची बैठक उद्या, १९ डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे. बैठकीत विविध संघटनात्मक मुद्द्यांवर तसेच विद्यमान राजकीय स्थितीवर उपस्थितांना मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली. केंद्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सी. टी. रवी हे उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे उदघाटन होणार आहे.

नागपुरात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मारक आणि आर्ट गॅलरीचा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर तेली समाजातील नागरिक उपस्थित होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. त्यांनी म्हटले की, समाजाला जेव्हा काही द्यायचा प्रश्न आला, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मागण्या मान्य केल्या. त्यामुळे आपली ही जबाबदारी आहे की पुन्हा एकदा २०१४ ते २०१९ चा काळ महाराष्ट्रात आला पाहिजे. त्यासाठी आपण सर्व समाजातील लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभे राहिले पाहिजे असे आवाहन बावनकुळे यांनी केले. फडणवीस यांनी कधीही आपल्याकडून (समाजाकडून) अपेक्षा व्यक्त केली नाही, की अमक्या समाजाने माझ्यासाठी हे करावं. देवेंद्र फडणवीस यांना फक्त पदावर बसवण्यासाठी नाही तर सर्व समाजाला न्याय मिळण्यासाठी आता आपली जबाबदारी वाढली आहे असे ही बावनकुळे म्हणाले.

हे ही वाचा : 

क्लीन चिटनंतर किरीट सोमय्यांचा पुन्हा संजय राऊतांवर हल्लाबोल

Gram Panchayat Election 2022 ग्रामपंचायत निवणुकांना लागले गालबोट, औरंगाबादमध्ये मतदान केंद्राबाहेर झाली हाणामारी

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss