spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

द्रौपदी मूर्मु यांच्या मुंबई दौऱ्यात मातोश्रीवरील भेट नाही; संजय राऊत

राष्ट्रतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मु मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मु आज मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईत आल्यावर त्या भाजप खासदार, आमदारांशी संवाद साधणार आहेत. तसेच एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची देखील त्या भेट घेणार आहेत. त्याचबरोबर त्या मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी द्रौपदी मूर्मु यांच्या आजच्या दौऱ्यात मातोश्रीवरील भेट नाही हे स्पष्ट केले आहे.

 

पुढे राऊत यांनी राष्ट्रतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मु यांना दिलेल्या पाठिंब्याबाबत आपले मत मांडले, एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्यासाठी सज्ज आहे त्यासाठी त्यांना आमचा पाठिंबा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मु यांना शिवसेनेचं समर्थन दिलं आहे. या मागे कोणताही राजकीय विचार नाही. यामागे राजकीय फायद्या तोट्याचे गणित नाही. निवडणुकांचे गणित नाही. एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्यासाठी सज्ज आहे त्यासाठी त्यांना सेनेचा पाठिंबा आहे. आमचे अनेक आमदार आदिवासी भागातून आले आहेत. अनेक पदाधिकारी आदिवासी क्षेत्रात काम करतात. या सगळ्यांच्या भावना समजून घेतल्यावर पक्ष प्रमुखांनी उमेदवार द्रौपदी मूर्मु यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. असं संजय राऊत म्हणाले. शिवसेनेनं या आधीही प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

आमदार जयकुमार गोरेंना सर्वोच्च न्यायालयाकडून झटका

 

यासोबतच संजय राऊत यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सध्या महापुरामुळे लॉकडाऊनमध्ये आहे. राज्याच्या पुरात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळं उद्भवलेल्या परिस्थितीवर सरकारचं लक्ष नाही. शपथ घेतली म्हणजे सरकार अस्तित्वात असं होत नाही. महाराष्ट्र वाऱ्यावर आहे. मंत्रीमंडळ अस्तित्वात नाही. अधिकारी जागेवर नाहीत. असा आरोप करत राज्यापाल आता कुठे आहेत ? असा सवाल देखील संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

 

Latest Posts

Don't Miss