spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Share Market Opening Bell दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक, सेन्सेक्सने ओलांडला ६१ ००० अंकांचा टप्पा

शेअर बाजारात आज तेजीचे संकेत दिसत आहेत. शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर काही वेळेतच सेन्सेक्सने (Sensex) ६१ हजार अंकांचा टप्पा ओलांडला.

Share Market Opening Bell : शेअर बाजारात आज तेजीचे संकेत दिसत आहेत. शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर काही वेळेतच सेन्सेक्सने (Sensex) ६१ हजार अंकांचा टप्पा ओलांडला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६७. ९९ अंकांच्या तेजीसह ६१,४०५.८० अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) १९.१० अंकांच्या तेजीसह १८,२८८.१० अंकांवर खुला झाला.

निफ्टी निर्देशांकातील पॉवरग्रीडच्या शेअर दरात २.१६ टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. तर, आयटीसीच्या शेअर दरात १.८७ टक्के, नेस्लेच्या शेअर दरात १.५८ टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. बजाज ऑटोच्या शेअर दरात १.१४ टक्क्यांची दिसत आहेत. तर, इन्फोसिसच्या शेअर दरात १.१६ टक्क्यांची घसरण दिसत आहे. सनफार्मामध्ये १.०१ टक्के, ओएनजीसीच्या शेअर दरात ०.९९ टक्के, टाटा मोटर्सच्या शेअर दरात ०.८५ टक्के, बीपीसीएलच्या शेअर दरात ०.८५ टक्क्यांची घसरण दिसत आहे.

शेअर बाजारात आज तेजीचे संकेत दिसत आहेत. शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर नफावसुलीने काही प्रमाणात निर्देशांकात घसरण दिसली. मात्र, त्यानंतर बाजार सावरला. सकाळी ९.५० वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स ९३ अंकांच्या तेजीसह ६१,४३१ .६९ अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी २३.३५ अंकांच्या तेजीसह १८,२९२.३५ अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी ५० मधील ३५ कंपन्यांचे शेअर तेजीत दिसून आले. तर, १५ कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली.

सेन्सेक्स निर्देशांकात समावेश असणाऱ्या ३० पैकी २१ कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. यामध्ये भारती एअरटेल, पॉवरग्रीड, आयटीसी, महिंद्रा अँण्ड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, एचडीएफसी, अल्ट्राटेक, हिंदुस्तान युनिलिव्हर, एनटीपीसी, टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे.

२०२२ च्या शेवटच्या पूर्ण ट्रेडिंग आठवड्यात आशियाई शेअर बाजारांमध्ये संमिश्र कल दिसून आला. पुढील वर्षी व्याजदरात वाढ होण्याची शक्यता असल्याने निर्माण झालेल्या चिंतेने बाजारातील गुंतवणूक कमी झाली आहे.

हे ही वाचा : 

‘मोर्चा फेक गेला’ म्हणणाऱ्या भाजपाला सामाना’तून प्रत्युत्त

FIFA World Cup Final 2022 अर्जेंटिनावर पैशांचा पाऊस!, विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांवरही FIFA कडून बक्षिसांची लूट

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss