spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कर्नाटक सरकारची अशी दडपशाही योग्य नाही, सरकरने ठोस भूमिका घेतली पाहिजे, अजित पवार संतप्त

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter session) आजपासून (१९ डिसेंबर २०२२) नागपुरात सुरुवात होतेय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राज्यातील शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकारला विरोधकांनी धारेवर धरलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यानंतर सभागृहात अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारच्या सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनाही बेळगावात प्रवेशबंदी करण्यात असल्याच्या मुद्यावरून संतप्त झाले.

हेही वाचा : 

Maharashtra Winter Session 2022 मिंधे सरकारविरोधात ‘मविआ’चे आमदार आक्रमक, पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी

तत्पूर्वी, अजित पवार यांनी कर्नाटकच्या दडपशाहीवर (Maharashtra Karnataka Border Dispute) हल्लाबोल केला. पवार म्हणाले, एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे राज्याचे मंत्री आहेत. सभागृहात पक्षाच चिन्ह वापरणं योग्य नाही. सीमा प्रश्नावर अमित शहाAmit Shah) यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. मात्र, वर्तमानपत्रात अनेक बातम्या आल्या आहेत. माध्यमांमध्येही बातम्या झळकल्या आहेत. ६ डिसेंबरला दोन मंत्री कर्नाटकला जाणार होते. त्यानंतर कोणालाही जाण्यास येण्यास बंदी करायची नाही अस ठरलं होतं. मात्र, एका खासदाराला बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कशी बंदी आणू शकतात? अशी दडपशाही योग्य नाही. सरकरने ठोस भूमिका घेतली पाहिजे.

हे सरकार घाबरट सरकार आहे, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी धमकी दिल्यावर दोन मंत्री घाबरून तिकडे गेलेच नाही, आदित्य ठाकरे

“महाराष्ट्र एकीकरण समितीचा आज महामेळावा होणार होता. या मेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जमाव बंदीचा आदेशही देण्यात आला आहे. या महामेळाव्यासाठी तयार करण्यात आलेलं व्यासपीठ पोलिसांनी हटवलं आहे. या स्टेजवरचं साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या विरोधात विरोधक आक्रमक झालेत. असा प्रश्न अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला आहे.

Latest Posts

Don't Miss