spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अगदी थोडक्यात डोळा वाचला, कलर्स मराठीवरील मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याला दुखापत

कलर्स मराठीवरील (Colors Marathi) जीव माझा गुंतला (jeev maza guntala) मालिकेत अंतरा – मल्हार आजवर अनेक आव्हानांना सामोरे गेले. अनेक कसोट्या त्यांनी एकत्र मिळून पार केल्या. काही अडचणींमध्ये अंतराला मल्हारची साथ मिळाली तर कधी सुहासिनी तिच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. गेल्या काही दिवसांपासून अंतरा आणि मल्हारवरील संकंट कमी होण्याचे नाव घेत नाही. आणि आता देखील मल्हारच्या हाताला दुखापत झाल्याने त्याची सर्जरी होणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी तिला पैशांची नितांत गरज आहे. त्यामुळे सर्जरी कशी निर्विघ्नपणे पार होईल हे अंतराच्या समोरच सगळ्यात मोठं आव्हानं आहे. आणि तेच पूर्ण करण्यासाठी अंतराने रेसमध्ये सहभागी होण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. आणि याच रेसमध्ये आयोजक म्हणून मालिकेत नवी एंट्री झाली. यात महाराष्ट्राचा लाडका अभिनेता देवदत्त नागे (Devdutt Nage) जीव माझा गुंतला मालिकेत तुषार देसाई हे महत्वपूर्ण पात्र साकारणार आहे. आता हे पात्र निगेटिव्ह असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. दरम्यान, देवदत्तला आता काही दिवसांसाठी त्याला या मालिकेच्या चित्रीकरणामधून ब्रेक घ्यावा लागत आहे.

हेही वाचा : 

Hemant Godse एक मच्छर आदमी को… राऊतांच्या टीकेला हेमंत गोडसेंनी दिलं प्रत्युत्तर

देवदत्तने त्याच्या इन्स्टाग्राम हँडेलवरून स्टोरीद्वारे ‘जीव माझा गुंतला’च्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याला दुखापत झाली असल्याचं दिसत आहे. अगदी डोळ्याच्या खालच्या बाजूला दुखापत झाली असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. दुखापतीमुळेच देवदत्तला मालिकेमधून ब्रेक घ्यावा लागणार आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये देवदत्त म्हणाला, “आता काही दिवसांसाठी आराम. ‘जीव माझा गुंतला’ मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान छोटी दुखापत झाली. देवाचे आभार की थोडक्यात डोळा वाचला.” देवदत्तच्या डोळ्याच्या खालच्या बाजूला जखम दिसत आहे.

Latest Posts

Don't Miss