अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी झाला आणि तो स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात रोमांचक फुटबॉल फायनलपैकी एक ठरला. वर्ल्ड कप फायनलचे आणखी एक आकर्षण म्हणजे स्टार गोल्ड ट्रॉफी जी लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने जिंकली. कतारमध्ये झालेल्या FIFA विश्वचषक २०२२ बद्दल आणखी एक ऐतिहासिक गोष्ट म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भव्य ट्रॉफी लॉन्च केली. यामुळे फिफाच्या इतिहासात भारताला अभिमान वाटावा अशी कामगिरी करणारी दीपिका पदुकोण ही पहिली भारतीय ठरली आहे. भारताच्या सर्वात मोठ्या ग्लोबल एंबेसडरपैकी एक असलेल्या दीपिका पदुकोणने फिफा दिग्गज आणि माजी स्पॅनिश फुटबॉलपटू इकर कॅसिलास फर्नांडीझ यांच्यासह लुई व्हिटॉन ट्रंकमधून ट्रॉफीचे अनावरण केले.
दीपिका पदुकोणने FIFA WC 2022 ट्रॉफी का लाँच केली?
पठाण अभिनेत्री दीपिका पदुकोणची कतारमध्ये FIFA विश्वचषक २०२२ ट्रॉफीचे अनावरण करण्यासाठी निवड करण्यात आली कारण ती या वर्षी मे महिन्यात लक्झरी कपडे आणि अॅक्सेसरीज ब्रँड लुई व्हिटॉनची ग्लोबल एंबेसडर आहे. २०१० पासून लुई व्हिटन फिफा विश्वचषकाचा भागीदार आहे. गेल्या दहा दशकांपासून फुटबॉल विश्वचषकाला लुई व्हिटनने दिलेल्या पाठिंब्यामुळे, १८ डिसेंबर रोजी अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स फायनलच्या आधी ट्रॉफी लॉन्च करण्यासाठी ब्रँडची ग्लोबल एंबेसडर दीपिका पदुकोणची निवड करण्यात आली.
दीपिका पुन्हा होतेय कपड्यांवरून ट्रोल
दीपिका पदुकोण सध्या कतारमधील लुसेल स्टेडियमवर फिफा विश्वचषक २०२२ ट्रॉफीचे अनावरण केल्यानंतर चर्चेत आहे. मात्र यादरम्यान पठाण चित्रपटानंतर आता दीपिका तिने कतारमध्ये घातलेल्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा प्रचंड ट्रोल होत आहे. खरं तर अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या विजेतेपदाच्या सामन्यापूर्वी दीपिकाने फिफा विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण केले. यादरम्यान दीपिकाने सैल काळी पँट, पांढरा शर्ट आणि तपकिरी लेदर कोट घातला आहे. त्याचवेळी दीपिकाच्या ड्रेसवरच्या स्टेटमेंट बेल्टनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पण दीपिकाचा हाच लूक अनोखा लुक पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. दीपिकाच्या ड्रेसवर टीका करताना एका यूजरने लिहिले आहे की, दीपिका पदुकोणने रणवीर सिंगच्या अलाउद्दीन खिलजीचे चिलखत परिधान करून फिफा वर्ल्ड कप ट्रॉफीचे अनावरण केले हे सर्वांनी लक्षात घ्यावे. तर दुसऱ्या एका युजरने आता दीपिकाने अंग झाकणारे कपडे का घातले आहेत, कारण ती कतारमध्ये आहे म्हणून? असा खोचक सवाल देखील केला आहे.
Why is Deepika Padukone all covered up here??No skimpy clothes & plunging necklines coz it is Qatar?? pic.twitter.com/rnlmeKSeLm
— Rosy (@rose_k01) December 18, 2022
Deepika Padukone was in Qatar, Muslim country where she can’t spoil their girls and women by wearing bikini types cloths hence full covered, she and her #Pathan can only do this in India to throw our girls in LJ like #ShraddhaWalkar #FIFAWorldCupFinal
— Sonali Mehta🇮🇳 (@sonali_mehta25) December 18, 2022
What an honour for #India and @deepikapadukone but her stylist went awol? #DeepikaPadukone #WorldCup2022 pic.twitter.com/TpxWKqyS8r
— Puneet Bhandal (@ByPuneetBhandal) December 18, 2022