spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

VIDEO : भाजी विक्रेत्याचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

हिंगणघाट शहरात चक्क नालीच्या पाण्यात भाजीविक्रेता भाजी धुताना चा व्हिडिओ कॅमेरेर्‍यात कैद झाला आहे तेव्हा भाजी विक्रेत्याकडून नागरिकांच्या आरोग्याची खेळी केल्या जात आहे .विडीयो मधील घटना स्थळ शहराती मनसे चौक येथील आहे .तेव्हा प्रशासन काय करणार किंवा अशातच बंडी वरती भाजी खरेदी करताना लोकांना आता विचार करावा लागणार अशीच काही घटना हिंगणघाट शहरात घटली असून संबंधित भाजीवाला कॅमेरात कैद झाला आहे आणि भाजीवाला स्पष्टरित्या नालीतल्या पाण्यामध्ये भाजी धुताना दिसून राहिला आहे तेव्हा शहरातील जनतेने भाजी विक्री करत्याना भाजी घेताना कुठली काळजी घ्यावी आणि कुणावर विश्वास ठेवावा हेच समजण्या पलीकडले दृश्य समाज माध्यमावर प्रसारित होत आहे. गल्ल्याबोळ्यात भाजीवाल्यांपासून विश्वास ठेवून जनता हि निसंकोचपणे भाजी विक्री करते पण ह्या घटनेने हिंगणघाट शहराला हादरवून टाकलेली आहे. शहरात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकात प्रत्येक वार्डात प्रत्येक प्रभागात भाजी विक्री जनता जवळपास हात ठेवल्यावाल्याजवळ करताना दिसतात तेव्हा आरोग्याच्या दृष्टीने भाजीविक्रेते ज्यांचेशी खेळत आहे तेव्हा प्रशासनाकडून कुठली दखल घेऊन कारवाई केली जाते किंवा जनतेलाच ही काळजी घ्यावा लागेल .असेच काही विचित्र प्रकार इतर भाजीवाले तर करत नाही ना हाही प्रश्न आता जनतेच्या मनात होऊ लागला आहे . योग्य त्या कारवाई ची अपेक्षा ठेवून जनता आहे तेव्हा हिंगणघाट प्रशासन कुठपर्यंत जनतेच्या हितासाठी प्रयत्न करणार हेच बघावं लागणार आहे.

Latest Posts

Don't Miss