spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

डिसेंबर आला तरी, मुंबईकर उकाड्याने हैराण!

मुंबईतील तापमानातील बदलांमुळे लोकांच्या आरोग्याच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अनेकांना सर्दी, खोकला, अंग दुखीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

मुंबईतील तापमानातील बदलांमुळे लोकांच्या आरोग्याच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अनेकांना सर्दी, खोकला, अंग दुखीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हिवाळ्यात मुंबईत सलग तीन दिवस कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या वर बघायला मिळत आहे. उकाड्यामुळे मुंबईकर हैैराण झाले आहेत.

मुंबई शहरात डिसेंबर महिन्यात सामान्य तापमानापेक्षा २-३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. डिसेंबरमध्ये शहरातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान १९८७ मध्ये ३८ अंश सेल्सियस नोंदवले गेले होते. मात्र, येत्या २-३ दिवसात पुन्हा एकदा तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ख्रिसमसमध्ये पुन्हा एकदा थंडीचा अनुभव घेता येऊ शकेल. मुंबईत १६ डिसेंबर रोजी कमाल तापमान ३५.६ अंश नोंदवले गेले. १७ डिसेंबर रोजी तेच वाढून ३५.९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. काल देखील मुंबईतील तापमान ३५.२ अंशांपर्यंत तापमान गेलं. सोबतच किमान तापमानात वाढ झालेली दिसते आहे. मागील ३ दिवसात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस आहे.

मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये गर्दी बघायला मिळते आहे. कारण आहे ऐन हिवाळ्यात गायब झालेली थंडी. थंडीच्या महिन्यातही मुंबईचा पारा ३६ अंशांपर्यंत पोहोचलाय. त्यामुळे अनेकांचे स्वेटर्स आणि शॉल अजूनही धूळखात तर पडल्याच आहेत. मात्र, सोबतच सर्दी, खोकला आणि अंगदुखीसारख्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता काही दिवसांपूर्वी ३०० पार बघायला मिळाली होती. अशात अनेकांना सर्दी, खोकल्याच्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. मात्र, हिवाळ्यातही तापमान ३५ अंशापार असल्यानं तीच परिस्थिती बघायला मिळते आहे.

मुंबईतील पारा मागील तीन दिवसांपासून ३५ अंश सेल्सिअस पार बघायला मिळतोय. मुंबईत अजूनही म्हणावी तशी थंडी जाणवत नाही आहे. १६ आणि १७ डिसेंबर रोजी मुंबईतील कमाल तापमान देशात सर्वाधिक बघायला मिळाले. त्यामुळे उन्हाळा सुरु आहे की हिवाळा हेच समजायला मार्ग नाही. हिवाळ्यात तापमान ३५ अंशांपर्यंत तापमान जात असल्याने अनेकांना सर्दी, ताप, खोकला, शरीर दुखणे यांसारख्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं बघायला मिळतंय. याचा परिणाम लहान मुलांच्याही आरोग्यावर होतोय.

हे ही वाचा : 

FIFA World Cup 2022 च्या समारोप समारंभात नोरा फतेही चमकली, दमदार परफॉर्मन्सने केले चाहत्यांना थक्क

IPL 2023 Auction IPL लिलाव 23 डिसेंबरला होणार, जाणून घ्या ‘या’ बड्या खेळाडूंची मूळ किंमत

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss