spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Messi Love Story जाणून घ्या मेस्सीची अनोखी लव्हस्टोरी

लिओनेल मेस्सीच्या नेतृत्त्वात अर्जेंटिनानं फिफा वर्ल्ड कप स्पर्धेवर नाव कोरलं आहे. अर्जेटिनानं तब्बल ३६ वर्षानंतर वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. मेस्सीच्या संघानं इतिहास रचला त्यावेळी त्याचं संपूर्ण कुटुंब देखील मैदानावर उपस्थित होतं.

Lionel Messi Antonela Roccuzzo : लिओनेल मेस्सीच्या नेतृत्त्वात अर्जेंटिनानं फिफा वर्ल्ड कप स्पर्धेवर नाव कोरलं आहे. अर्जेटिनानं तब्बल ३६ वर्षानंतर वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. मेस्सीच्या संघानं इतिहास रचला त्यावेळी त्याचं संपूर्ण कुटुंब देखील मैदानावर उपस्थित होतं. लिओनेल मेस्सीची पत्नी एंटोनेला रोकुजो हिची देखील जोरदार चर्चा सुरु आहे.

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सीचा संघ आता विश्वविजेता बनला आहे. फ्रान्सच्या विरुद्ध अर्जेंटिनानं रविवारी झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत पेनल्टी शुटआऊटमध्ये विजय मिळवला. अर्जेंटिनानं पेनल्टी शुटआऊटमध्ये ४-२ असा विजय मिळवला. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्त्वात अर्जेंटिनानं तब्बल ३६ वर्षानंतर विश्वविजेतेपद पटाकवलं. या विजयासह मेस्सीचं वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. अंतिम फेरीचा सामना पाहण्यासाठी मेस्सीचं संपूर्ण कुटुंब मैदानावर उपस्थित होतं. मेस्सीची पत्नी एंटोनेला रोकुजो तीन मुलांसह मैदानावर उपस्थित होती.

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मेस्सीने आपल्या कुटुंबासोबत सेलिब्रेशन केलं. मेस्सीची बायको एंटोनेला रोकुजो आणि त्याची तिन्ही मुलं मैदानात आली होती. वर्ल्ड कप विजयानंतर अवॉर्ड सेरेमनी झाली. त्यावेळी मेस्सीच पूर्ण कुटुंब मैदानात हजर होतं. मेस्सीने वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन पूर्ण कुटुंबासोबत फोटो काढला. लिओनेल मेस्सीनं संघानं विजय मिळवल्यानंतर मैदानावर संपूर्ण कुटुंबासह जल्लोष केला. वर्ल्डकपच्या फायनल मॅचनंतर पारितोषिक वितरण झाल्यानंतर लिओनेल मेस्सीचं संपूर्ण कुटुंब मैदानावर उतरलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Antonela Roccuzzo (@antonelaroccuzzo)

पहिली भेट कधी झाली? –

Newell’s Old Boys क्लबकडून खेळताना लियोनल मेस्सी आपल्या मित्राच्या घरी डिनरसाठी गेला. त्यावेळी त्याची ओळख टीमच्या मिडफिल्डरच्या चुलत बहिणीशी झाली. ही होती एंटोनेला रोकुजो. सुरुवात मैत्रीने झाली. वयाच्या ११ व्या वर्षी मेस्सीने अर्जेंटिना सोडलं. तो बार्सिलोनाला शिफ्ट झाला.

लिओनेल मेस्सी आणि एंटोनेला रोकुजोची लव्ह स्टोरी –

लिओनेल मेस्सी आणि एंटोनेला रोकुजो यांची लव्ह स्टोरी विशेष आहे. कारण, दोघेही लहानपणापासून एकत्र आहेत, अजून देखील ते सोबत आहेत. दोघांची पहिली भेट ५ वर्षांचे असताना झाली होती. अर्जेंटिनाच्या रोसारियोमध्ये मेस्सीचं बालपण गेलं तिथचं त्याची भेट एंटोनेलासोबत झाली होती.

नेवेल्स ओल्ड बॉईज क्लब साठी खेळताना तो त्याच्या मित्राच्या घरी जेवणासाठी गेला होता. त्यावेळी त्याची भेट त्याच्या संघातील मधल्या फळीच्या खेळाडूची नातेवाईक असलेल्या एंटोनेला रोकुोजो सोबत झाली. तो त्यांच्या मैत्रीचा सुरुवातीचा काळ होता. ११ वर्ष वय असताना मेस्सी अर्जेंटिना सोडून बार्सिलोनामध्ये गेला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Leo Messi (@leomessi)

एका दुर्घटनेनं दोघे पुन्हा एकत्र –

मेस्सी बार्सिलोना मध्ये गेल्यानं एंटोनेलासोबत भेटणं बंद झालं होतं. २००४ पर्यंत दोघं एकमेकांपासून दूर राहिले होते. मात्र, एका दुर्घटनेनं दोघांना पुन्हा जवळ आणलं. एंटोनेला रोकुजोच्या सर्वात जवळच्या मित्राचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर मेस्सीनं तिला धीर दिला. यानंतर दोघांमध्ये पुन्हा बोलणं सुरु झालं आणि ते पुन्हा मित्र बनले. २००९ मध्ये लिओनेल मेस्सी आणि एंटोनेला रोकुजो यांनी त्यांचं नातं सार्वजनिकरित्या कबूल केलं. २०१२ मध्ये त्यांना पहिला मुलगा झाला. त्यानंतर २०१७ मध्ये दुसरा मुलगा झाला. २०१७ मध्ये लिओनेल मेस्सी आणि एंटोनेला रोकुजो यांनी लग्न केलं.

लिओनेल मेस्सी आणि एंटोनेला रोकुजो या मॉडेल असून बिझनेसवुमन आहेत. २०१६ मध्ये त्यांनी रिकी सार्कनी यांच्यासोबत मॉडेलिंगचा करार केला होता. २०१७ मध्ये त्यांनी ब्युटीक चेनची सुरुवात केली होती. एंटोनेला रोकुजो जवळपास प्रत्येक मॅचमध्ये लिओनेल मेस्सीला पाठिंबा देताना दिसते. कतारमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाच्या प्रत्येक मॅचसाठी एंटोनेला रोकुजो मैदानावर उपस्थित होती. मेस्सी आणि एंटोनेला रोकुजो हिला तीन मुलं असून त्यांची नावं थियागो मेस्सी, मॅटेओ मेस्सी, सिरो मेस्सी अशी आहेत.

 रिलेशनशिप पब्लिक कधी केली?

तेव्हापासून दोघांमध्ये पुन्हा चर्चा सुरु झाली. दोघे परस्परांचे चांगले मित्र बनले. २००९ मध्ये मेस्सी आणि एंटोनेलाने आपली रिलेशनशिप पब्लिक केली. २०१२ मध्ये या जोडप्याला पहिलं बाळ झालं. एंटोनेलाने एका मुलाला जन्म दिला.

एंटोनेला रोकुजो काय करते? –

एंटोनेला रोकुजो मॉडेल आणि बिझनेस वुमन आहे. २०१६ मध्ये तिने Ricky Sarkany सोबत मॉडेलिंग कॉन्ट्रॅक्ट साइन केलं. २०१७ मध्ये तिने बुटीक चेन सुरु केली. एंटोनेला प्रत्येक सामन्यात मेस्सीच समर्थन करताना दिसते.

 

हे ही वाचा : 

Google For India २०२२ च्या कार्यक्रमात कंपनीने केल्या मोठ्या घोषणा, नव्या वर्षात गुगलमध्ये होणार ‘हे’ नवे बदल

Savarkar Karnataka Assembly सावरकरांच्या फोटोवरून कर्नाटक विधानसभेत मोठा गोंधळ, काँग्रेस भडकली

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss