spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Jayant Patil महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात आता इलॉन मस्कची एन्ट्री?

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचे (Twitter) नवे प्रमुख इलॉन मस्क यांनी एक पोल जारी करून वापरकर्त्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यायचा का, असा प्रश्न त्यांनी एका पोलद्वारे लोकांना विचारला आहे. मतदानाचा जो काही निकाल येईल, तो त्याचे पालन करू, असे आश्वासन मस्क यांनी दिले आहे. सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत आलेल्या निकालानुसार या मतदानात ९३ लाख ३५ हजार लोकांनी मतदान केले आहे. यापैकी ५६.५ टक्के लोकांनी होकारार्थी उत्तर दिले आहे, तर ४३.५ टक्के लोकांनी मस्क यांना सीईओ पद न सोडण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा : 

Google For India २०२२ च्या कार्यक्रमात कंपनीने केल्या मोठ्या घोषणा, नव्या वर्षात गुगलमध्ये होणार ‘हे’ नवे बदल

मात्र, इलॉन मस्क(Elon Musk) यांच्या ट्विट रिट्विट करत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी (NCP leader Jayant Patil) त्याला थेट महाराष्ट्र कर्नाटक सीमावादातच ओढलं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. इलॉन मस्क आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून वरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या,असे जयंत पाटील यांनी लिहलं आहे.

Savarkar Karnataka Assembly सावरकरांच्या फोटोवरून कर्नाटक विधानसभेत मोठा गोंधळ, काँग्रेस भडकली

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हे ट्विट बोम्मई यांनी केले नव्हते असे सांगितले आहे. त्यामुळेच जयंत पाटली यांनी आता थेट मस्क यांना टॅग करत हे ट्विट नक्की कोणी केले हे सांगा असे म्हटले आहेत. एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देण्याबाबत ट्विक केल्याने जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे?

IPL 2023 Auction IPL लिलाव 23 डिसेंबरला होणार, जाणून घ्या ‘या’ बड्या खेळाडूंची मूळ किंमत

Latest Posts

Don't Miss