spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Christmas 2022 ख्रिसमस दरम्याम खाल्ले जाणारे ‘हे’ पदार्थ तुमच्या पाळीव कुत्र्यासाठी ठरू शकतात घातक

मात्र सावधान! कारण तुम्हाला पौष्टिक वाटणारं अन्न कदाचित तुमच्या कुत्र्यांसाठी घातक ठरू शकत.

ख्रिसमस हा वर्षाचा एक अद्भुत काळ आहे जो कुटुंबांना एकत्र आणतो आणि त्यात पाळीव प्राण्यांचाही समावेश होतो. अलीकडच्या काळात माणसं जरी एकमेकांपासून दूर जात असली तरी त्यांच्या घरात असणारा एखादा पाळीव प्राणी त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आणि जवळचा होत चाललाय. मग तो कुत्रा असुदे, एखादं मांजर असुदे किंवा मग एखादा पाळीव पक्षी असुदे. आपल्या आयुष्यातल्या सर्वच लहान – मोठ्या आनंदाच्या क्षणात माणसं आपल्या प्राण्यांना सामील करू पाहतात आणि असाच एक क्षण म्हणजे ख्रिसमस. ख्रिसमसच्या सणादरम्यान आनंदाच्या भरात आपल्या कुत्र्याला किंवा मांजरीला आपल्यात सामील करून घ्यायचं म्हणून आपण अनेकदा आपल्या ताटातलं अन्न त्यांना खाऊ घालतो. मात्र सावधान! कारण तुम्हाला पौष्टिक वाटणारं अन्न कदाचित तुमच्या कुत्र्यांसाठी घातक ठरू शकत. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत अशाच काही पदार्थांबद्दल:

ख्रिसमसचे कोणते अन्न तुम्ही कुत्र्याला खाऊ शकत नाही?

कुत्र्याची पचनसंस्था माणसांपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने कार्य करते आणि म्हणून असे काही पदार्थ आहेत जे मनुष्य खाऊ शकतो पण कुत्रा नाही आणि सणासुदीच्या खाद्यपदार्थांमध्ये असे एक ना अनेक पदार्थ समाविष्ट असतात:

  • ख्रिसमस केक, ख्रिसमस पुडिंग, फ्रूट केक आणि माईन्स पाई – या सर्वांमध्ये द्राक्षे, मनुका आणि सुलताना असतात जे कुत्र्यांसाठी अत्यंत विषारी असतात,
  • कांदे, लसूण, शेलॉट्स, लीक्स आणि चिव्स – ग्रेव्ही किंवा स्टफिंग सारख्या ख्रिसमसच्या पदार्थांमध्ये हे पदार्थ आढळतात. ज्या कुत्र्यांसाठी अत्यंत विषारी असू शकतात.
  • टर्कीची हाडे – विशेषत: जर ती शिजवलेले असतील तर, कुत्र्यांच्या तोंडात हाडे सहजपणे विखुरतात आणि गिळल्यास त्यांच्या तोंडाला, गळ्याला किंवा त्यांच्या आतील भागालाही नुकसान होऊ शकते.
  • अल्कोहोल – ख्रिसमसच्या वेळी दारूचे सेवन अगदीच सामान्य आहे, परंतु अल्कोहोलचा कुत्र्यांवर मानवांपेक्षा जास्त प्रभाव पडतो आणि म्हणून आपण आपल्या कुत्र्याला या परंपरेत सामील करून न घेणेच सोईचे ठरेल.
  • चॉकलेट – हा आणखी एक पदार्थ आहे जो ख्रिसमसच्या दरम्यान अगदी मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो, परंतु चॉकलेटमध्ये थिओब्रोमाइन नावाचे रसायन असते, जे कुत्र्यांसाठी अत्यंत विषारी असते.
  • फॅटयुक्त पदार्थ – जास्त कॅलरी असलेले पदार्थ जसे की तेल किंवा चीज सॉसमध्ये शिजवलेल्या भाज्या मुख्यत्वे आपल्या कुत्र्याला देणे टाळावे.

हे ही वाचा:

Merry Christmas 2022 ‘ख्रिसमस ट्री’ची सजावट करायचीय? मग या सोप्या डेकोरेशन आयडियाज नक्की करा ट्राय

Christmas 2022 BTS मेंबर V चे ‘Christmas tree’ गाणं लोकांना घालतेय भुरळ, पण या गाण्यामागे दडलेली कथा माहीत आहे का तुम्हाला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss