spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पाठक बाईंनी का धरली राणादा ची कॉलर ?

सध्या ते दोघेही लंडनमध्ये असल्याचं त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट वरून दिसून येतय. 

मुंबई :  ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतुन राणादा आणि पाठकबाई यांची केमेस्ट्री आपल्यासमोर आली. त्यानंतर या दोघांनी साखरपुडा करून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला. प्रेक्षकांनी जसे या मालिकेतील जोडीवर प्रेम केले तसेच प्रेम रिअल लाईफ जोडीवर देखील करताना दिसून येतायत. सध्या ते दोघेही लंडनमध्ये असल्याचं त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट वरून दिसून येतय.

लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करत असताना, हार्दिक ने मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अक्षया ही हार्दिकची कॉलर पकडते आहे असं दिसून येतंय. या व्हिडीओत हार्दिक हा अभिनेता नितीश चव्हाणला म्हणतो, “बघ मित्रा पितळेला घासून ते कधीच सोनं बनू शकत नाही. त्यावर नितीश चव्हाण तुम्ही असं का म्हणता? असे विचारतो. त्यावर हार्दिक म्हणतो कारण माझी बायको ही ब्युटी पार्लरमध्ये गेली आहे. हार्दिकचे हे वाक्य अक्षया ऐकते आणि ती चांगलीच वैतागते.”

हेही वाचा :

प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा-भाईंदर मधील 18 नगरसेवक शिंदे गटात सामील

 

त्यानंतर अक्षया ही नितीशकडे रागात बघते. त्यानंतर ती हार्दिकची कॉलर पकडते आणि त्याच्याकडे रागात बघते. हार्दिक ने या व्हिडीओला हिम्मतवाला असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंट्सची रांग लागलीए. अभिनेता माधव देवच्चके ने देखील यावर हसण्याची कमेंट केली आहे.

अक्षया आणि हार्दिक यांनी याआधी मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता देखील ते प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कमी पडत नाहीए. याशिवाय राणादा आणि पाठकबाईंनी  त्याचे फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये दोघेही अगदी मेड फॉर ईच अदर दिसतायत.

हेही पहा : 

महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दरात कपात

Latest Posts

Don't Miss