spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोठी बातमी ! Elon Musk Twitter च्या CEO पदाचा देणार राजीनामा

जगातील श्रीमंत व्यक्ती (Richest Person in the World) आणि ट्विटरचे (Twitter) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी मोठी घोषणा केली आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Elon Musk : जगातील श्रीमंत व्यक्ती (Richest Person in the World) आणि ट्विटरचे (Twitter) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी मोठी घोषणा केली आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा देण्याचे संकेत एलॉन मस्क यांनी काही दिवस आधी दिले होते.

मस्क यांनी दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी ट्विटरवर पोल करत विचारलं होतं की, ‘मी ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा द्यावा का? तुम्ही सांगाल तसं मी करेन.’ मस्क यांच्या या ट्विटमुळे (Elon Musk Tweet) मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर आता एलॉन मस्क यांनी सीईओपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. या पोलवर ५७.५ टक्के लोकांनी मस्क यांनी राजीनामा द्यावा यासाठी मतदान केलं आहे. तर ४२.५ टक्के लोकांच्या मते मस्क यांनी राजीनामा देऊ नये. सीएनबीसीच्या मंगळवारी आलेल्या एका अहवालानुसार, एलॉन मस्क ट्विटरच्या नवीन सीईओच्या शोधात आहेत.

 ट्विटर कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा लवकरच राजीनामा देणार असल्याची मोठी घोषणा एलॉन मस्क यांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत ही मोठी घोषणा केली आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, ‘मी ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरचं सीईओ पद सांभाळण्यासाठी पात्र असा मूर्ख व्यक्ती सापडताच मी लगेच राजीनामा देईन. त्यानंतर मी फक्त सॉफ्टवेअर चालवेल आणि सर्व्हर टीमच्या कामकाजावर लक्ष ठेवेन.’

एलॉन मस्क यांनी ट्विटरची जबाबदारी स्वीकारून अवघे दोन महिने झाले आहेत. त्यामुळे ट्विटर पोल मस्क यांच्यासाठी निराशाजनक ठरला आहे. सीईओपदाची जबाबदारी स्वीकारून फक्त दोन महिने झाले असताना, नेटकऱ्यांनी त्यांना ट्विटरच्या सीईओ पदावरून हटवण्यासाठी मतदान केले आहे. ट्विटर पोलनुसार, मस्क यांनी CEO पदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केली आहे.

 

हे ही वाचा : 

WINTER SESSION 2022 च्या पहिल्याच दिवशी शिंदेचा मोठा दावा; बोम्मईंच्या फेक ट्विटमागे कोणचा हात! |

Maharashtra Winter Session 2022 आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन आमदार सरोज अहिरे पोहचल्या विधानभवनात

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss