spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्राचे राजकारण बीएमसीच्या मैदानात, शिवसेनेला विरोध करत मिलिंद दौरा यांचा फडणवीसांना पाठिंबा

महाविकास आघाडी बरखास्त झाल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालक झालेली आहे.

मुंबई : महाविकास आघाडी बरखास्त झाल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालक झालेली आहे. दिवसेंदिवस शिवसेनेतील नगरसेवक आणि पदाधिकारी गटात सहभागी होत आहेत. त्यातच काल मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद दौरा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी शिवसेनेवर टीका केली त्यांच्या टीकेची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी लगेच ट्विट करत प्रतिक्रिया देखील दिली.

 मिलिंद दौरा यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये शिवसेनेवर टीका करत वॉर्डरचना ही अनधिकृत आणि अवैद्य आहे असे म्हटले. “मुंबई महानगरपालिका भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका मुक्तपणे आणि निष्पक्षपणे पार पाडले आहेत. केवळ एका पक्षाच्या फायद्यासाठी मुंबई बॉर्डरचनामध्ये फेरबदल करणे हे अनैतिक आणि राजघटनेच्या विरोधात आहे. म्हणून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे” अशी त्यांनी माहिती दिली.

 पुढे मिलिंद देवरा म्हणाले “महाराष्ट्र सरकारच्या बीएमसी मध्ये लिंग आणि जातीच्या आधारावर प्रभागांची पुनर्रचना आणि आरक्षित करण्याच्या परिशिमान आणि सीमांकनाचा एक भाग म्हणून फेब्रुवारी 2022 मध्ये सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या होत्या बीएमसी आणि राज्य सरकारकडून जवळपास 800 हरकती प्राप्त झाल्या होत्या निवडणूक आयोगाकडून यापैकी कोणताही विचार करण्यात आलेला नाही केवळ एका पक्षाच्या फायद्यासाठी अशा पद्धतीची प्रभाग रचना करण्यात आली” असे मिलिंद देवरा यांनी आपल्या पत्रातून म्हटले आहे.

हेही वाचा : 

पाठक बाईंनी का धरली राणादा ची कॉलर ?

Latest Posts

Don't Miss