spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने ४४ फोन

सध्या महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे आणि आजचा तिसरा दिवस आहे. आज सुद्धा विरिधकांकडून विधानसभेच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर लोकसभेत आज आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यानंतर आता शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिशा सालियान आणि इतरांच्या फोनवर आदित्य ठाकरेंच्या नावानं फोन आल्याचा दावा त्यांनी बिहार पोलिसांच्या हवाल्यानं केला आहे.

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्या (suicide) प्रकरणावरून आधीपासूनच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यातच आता राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केलेल्या या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. “एयूचा विषय खूप गंभीर आहे. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असा आहे. बिहार पोलिसांनी (Bihar Police) याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणी सीबीआय (CBI), बिहार पोलिस आणि मुंबई पोलिसांचा (Mumbai Police) तपास वेगवेगळा आहे. त्यामुळे याची माहिती लोकांना मिळाली पाहिजे”, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.

आज लोकसभेत डग्रसंबंधी चर्चा सुरू आहेत. या चर्चेत अनेकांनी भाग घेतला. माझ्या भाषणाआधी चार ते पाच खासदारांनी सुशांतच्या केसचा उल्लेख केला. तोच विषय मी सभागृहात उपस्थित केला. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर सीबीआय, बिहार पोलिस आणि मुंबई पोलिसांनी तपास केला. परंतु, या तिघांच्या तपासाची माहिती जनतेपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे जनतेच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. ड्रग्जसंबंधात (Drugs) रियाची चौकशी करण्यात आली होती. सुशांत्या मृत्यूपूर्वी रियाला जे कॉल आले होते, त्यासंदर्भात बिहारच्या पोलिांच्या तपासात उल्लेख आहे. रियाला ते कॉल एयू या नावाने आले होते. या तपासाच्या टीमने एयूचा अर्थ अनन्या उद्धव असा सांगितला होता. परंतु, एयूचा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे, अशी माहिती बिहार पोलिसांनी दिली आहे. सीबीआयने याबाबतची माहिती अद्याप लोकांसमोर आणलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाच्या तपासाची माहिती जनतेला मिळावी म्हणून मी हा मुद्दा आज लोकसभेत उपस्थित केला, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

तालिबान्यांनी पुन्हा घेतला विचित्र निर्णय, अफगाण मुलींच्या विद्यापीठ शिक्षणावर घातली बंदी

Pune News विमान प्रवासासाठी पुणे विमानतळ व्यवस्थापकांकडून आवाहन, विमानतळावर आता ‘इतका वेळ’ आधी हजर राहा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss