spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रिया चक्रवर्तीला ठाकरे पिता-पुत्रांनी केले होते ४४ कॉल्स?, पुन्हा ‘त्या’ प्रकरणाच्या चौकशीबाबत CM शिंदेंचं सूचक विधान

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput Death) प्रकरणी काल बुधवारी (२१ डिसेंबर) लोकसभेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. सुशांत सिंग मृत्यूप्रकरणी पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडण्याची शक्यता आहे. राहुल शेवाळे म्हणाले की, सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला AUच्या नावाने ४४ फोन आले होते. बिहार पोलिसांच्या म्हणण्यानुसार, AU म्हणजे आदित्य आणि उद्धव (Aditya Thackeray and Uddhav Thackeray) लोकसभेतील राहुल शेवाळे यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषत: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट पुन्हा आमनेसामने येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : 

तब्बल १९ वर्षांनंतर चार्ल्स शोभराज तुरुंगातून बाहेर येणार, कोण आहे हा ‘बिकिनी किलर’?

या प्रकरणी एकनाथ शिंदे म्हणाले की, या केसच्या संदर्भात महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संभ्रम होता. मी त्याची माहिती घेऊन बोलतो. शिंदे यांनी एकप्रकारे चौकशीचे संकेत दिल्याचं स्पष्ट होत आहे. लोकसभेत बुधवारी नियम १९३ अतंर्गत ड्रग्ज संदर्भात लघू चर्चा पार पडली. या विषयावर बोलताना शिंदे गटाचे खासदार आणि गटनेते राहुल शेवाळे यांनी म्हटलं की AUचा विषय खूपच गंभीर आहे. AUचा अर्थ ‘अनन्या उद्धव’ असं नाही तर आदित्य उद्धव ठाकरे असंही बिहार पोलिसांनी म्हटलं आहे. मुंबई पोलिसांचा तपास वेगळा, बिहार पोलिसांचा तपास वेगळा तसेच सीबीआयचा तपास वेगळा आहे. त्यामुळं लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.

Coronavirus ‘गर्दीच्या ठिकाणी मास्क अवश्य लावा’, चीनमुळे आता भारतातही सरकार अलर्ट मोडवर

याबाबत अधिक माहिती देताना शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले, “शिंदे गटाच्या एका खासदाराने सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान यांच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे आरोपी आहेत, असं दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न अत्यंत निधेषार्ह आहे. आम्ही माननीय सभापतींकडे याबाबत हरकत घेतली. आदित्य ठाकरेंबाबत केलेला उल्लेख सभागृहाच्या कामकाजातून वगळण्याचा आग्रह धरला. यानंतर सभापतींनी आमची मागणी मान्य केली. पण गद्दार गटाच्या खासदाराचा मला धिक्कार करावासा वाटतो,” अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी केली.

maharashtra winter session 2022 हिवाळी अधिवेशनाचा दिवस चौथा, आज सभागृहात ५४ हजार कोटींच्या पुरवण्या मंजूर होणार?

Latest Posts

Don't Miss