spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Winter Solstice वर्षातला सर्वात लहान दिवस, जाणून घेऊया काय आहे या मागच भाैगाेलिक कारण?

आज २२ डिसेंबर वर्षांतला सर्वात लहाण दिवस असून हि खगोलीय घटना आहे. आज जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते तेव्हा सूर्य मकर राशीच्या उष्ण कटिबंधावर उभा असतो. यामुळे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात आज सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते. मध्य भारताबद्दल सांगायचे झाल्यास तिथे सूर्योदय सकाळी ७.०५ वाजता होईल. सूर्यास्त संध्याकाळी ५.४६ वाजता होईल. म्हणजे दिवसाची वेळ १० तास ४१ मिनिटे असेल. आणि रात्रीची वेळ १३ तास १९ मिनिटे असणार आहे.

आज विंटर सोलस्टीसला हिवाळी संक्राती असेही म्हंटलं जात. आज सूर्याची किरणे थेट दक्षिण विषुववृत्ताच्या बाजूला मकर राशीच्या उष्ण कटिबंधात पोहोचतात. विषुववृत्ताद्वारे हे किरण वर्षातून दोनदा पृथ्वीवर थेट पोहोचतात. या दिवशी सूर्यप्रकाशाचा कोन २३ अंश २६ मिनिटे १७ सेकंद दक्षिणेकडे असतो. म्हणून याला उत्तरायण देखील म्हणतात. सोलस्टीस हा लॅटिन शब्द आहे जो सोलस्टीम (solstim) वरून आलेला आहे लॅटिन शब्द सोलचा अर्थ सूर्य असा होतो आणि सेस्टेअरचा अर्थ स्थिर राहणे असा होतो . या दोन शब्दांना एकत्र करून संक्रांती हा शब्द तयार झाला आहे, ज्याचा अर्थ सूर्याचे स्थिर उभे राहणे असा होतो. या नैसर्गिक बदलामुळे आज सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र अनुभवायला मिळते .असाच दिवस आपल्यला पुन्हा पुढील वर्षी २१ मार्च रोजी अनुभवायला मिळेल.

संक्रांतीच्या वेळी दक्षिण गोलार्धात जास्त सूर्यप्रकाश असतो. कारण इतर ग्रहांप्रमाणे, पृथ्वी सुद्धा २३.५ अंशांवर झुकलेली आहे. झुकलेल्या अक्षावर पृथ्वीच्या फिरण्यामुळे सूर्याची किरणे एका ठिकाणी जास्त आणि दुसऱ्या ठिकाणी कमी पडतात. याच वेळी , उत्तर गोलार्धात कमी सूर्यप्रकाश असतो. यामुळे , या दिवशी सूर्य दक्षिण गोलार्धात जास्त काळ राहतो, आणि येथे दिवस मोठा असतो. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत आजपासून उन्हाळा चालू होईल.

हे ही वाचा:

हे सरकार भ्रष्ट मार्गानं सत्तेत आलं असून, भ्रष्टाचाराच्या ओझ्यानच पडेल, राऊतांच्या हल्लाबोल

रिया चक्रवर्तीला ठाकरे पिता-पुत्रांनी केले होते ४४ कॉल्स?, पुन्हा ‘त्या’ प्रकरणाच्या चौकशीबाबत CM शिंदेंचं सूचक विधान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss