spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी श्रीखंडाचे डबे घेऊन विरोधक आक्रमक, ‘गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न’

आज हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवस आहे. आजचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधक आज आक्रमक झाले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या पायरीवर येऊन जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारला धारेवर धरलं.

Maharashtra Assembly Winter Sessio 2022 : आज हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवस आहे. आजचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधक आज आक्रमक झाले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या पायरीवर येऊन जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारला धारेवर धरलं. खासकरून भूखंड घोटाळ्यावरून विरोधकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच घेरलं. विरोधकांनी हातात श्रीखंडाचे डब्बे घेऊन भूखंडाचे श्रीखंड खाल्ले कुणी? मुख्यमंत्र्यांनी… मुख्यमंत्र्यांनी… अशा घोषणाच दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली. आदित्य ठाकरे आणि रोहित पवार हे दोन्ही युवा नेते घोषणा देण्यात आघाडीवर होते. दोघांनीही हातात बॅनर घेतला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काल विरोधकांनी भूखंडावरून आरोप केला होता. त्याचे आजही पडसाद उमटले. विरोधकांनी विधानसभेच्या पायरीवर उभं राहून राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी राजीनामा देण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली. यावेळी राज्यपाल हटवा, महाराष्ट्र वाचवा, असं लिहिलेला बॅनर्स विरोधकांच्या हातात होता.

घेतले खोके, भूखंड ओके… दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे… राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… धिक्कार असो, धिक्कार असो, मिंधे सरकारचा धिक्कार असो… बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… राजीनामा द्या, राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या…महापुरुषांचा अपमान करणार्‍या भाजप सरकारचा धिक्कार असो…भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या सरकारचा धिक्कार असो… भूखंडाचा श्रीखंड खाल्ला कुणी, मुख्यमंत्री मुख्यमंत्री…गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न अशा जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर आजही दणाणून सोडला. महाविकास आघाडीच्या आमदारांनी भूखंडाचा श्रीखंड वाटून मिंधे सरकारचा निषेध केला. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

ही घोषणाबाजी सुरू असतानाच महाविकास आघाडीच्या आमदारांनी हातात श्रीखंडाचा डब्बा घेऊन राज्य सरकारचा निषेध केला. भूखंडाचा श्रीखंड खाल्ला कुणी… मुख्यमंत्र्यांनी… मुख्यमंत्र्यांनी… अशा घोषणाच विरोधकांनी दिल्या. विरोधकांच्या या घोषणाबाजीमुळे विधानभवन परिसर दणाणून गेला होता.

Latest Posts

Don't Miss