spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘या’ व्यक्तीने लावला होता Chicken Tikka Masala चा शोध, वयाच्या ७७व्या वर्षी झाले निधन

त्यांनी १९७० मध्ये 'चिकन टिक्का मसाला'चा (Chicken Tikka Masala) शोध लावला होता.

‘चिकन टिक्का मसाला’ चा (Chicken Tikka Masala) शोध लावणारे शेफ अली अहमद अस्लम (Ali Ahmed Aslam) यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले आहे. अस्लम यांनी आपल्या रेस्टॉरंटमध्ये शोधून काढलेला ‘चिकन टिक्का मसाला’ (Chicken Tikka Masala) ब्रिटनमध्ये खूप आवडीने खाल्ला जाणार पदार्थ आहे. त्यांच्या ‘शीश महल’ (Shish Mahal) या रेस्टॉरंटने त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. अस्लम यांच्या स्मरणार्थ शीश महल रेस्टॉरंट ४८ तास बंद ठेवण्यात आले. अस्लम यांच्या जाण्यावर रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांनी म्हटले की, “अरे, शीश स्नॉब्स… आज पहाटे अली मरण पावले… ही बातमी ऐकून आम्हाला सर्वांना फार दुःख होत आहे.”

पाकिस्तानचे रहिवासी होते शेफ अस्लम

अस्लमला ग्लासगोच्या (Glasgow) सेंट्रल मशिदीजवळ दफन करण्यात आले. याविधीसाठी त्यांच्या जवळच्या मित्रांना आणि परिचितांना बोलावण्यात आले. अस्लम हे आधी पाकिस्तानचे रहिवासी होते. १९६४ मध्ये, शीश महल रेस्टॉरंट आपल्या कुटुंबासह उघडण्यापूर्वी ते लंडनमध्ये स्थायिक झाले. ते विवाहित असून त्यांना पाच मुले आहेत.

अशा पद्धतीने अली अस्लम बनवायचे चिकन टिक्का मसाला (Chicken Tikka Masala)

AFP या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अस्लमने यांनी सांगितले की, त्यांनी १९७० मध्ये ‘चिकन टिक्का मसाला’चा (Chicken Tikka Masala) शोध लावला होता. खरे तर एका ग्राहकाने त्याच्याकडे चिकन टिक्काचा कोरडेपणा कमी करण्याचा काही उपाय आहे का, अशी मागणी केली होती. यानंतर अस्लम यांनी चिकन टिक्क्यात टोमॅटो सॉस मिक्स केला.

ते म्हणाले की “आम्हाला वाटले की आपण सॉसबरोबर चिकन अधिक चांगले शिजवू शकतो. त्यानंतर आम्ही दही, मलई आणि काही मसाले वापरून चिकन टिक्का मसाला (Chicken Tikka Masala) बनवायला सुरुवात केली. आमच्या ग्राहकांच्या आवडीनुसार ही डिश तयार केली जाऊ शकते. सहसा ते गरम करी खात नाहीत. , म्हणून आम्ही ती दही आणि मलईसोबत शिजवतो.”

‘या’ व्यक्तीनेदेखील केला होता चिकन टिक्का मसालावर (Chicken Tikka Masala) दावा

२००९ मध्ये तत्कालीन खासदार मोहम्मद सरवर (Mohammad Sarwar) यांनी अली मोहम्मद अस्लम (Ali Ahmed Aslam) यांनी बनवलेल्या या डिशचे वर्णन करून ती त्यांच्या नावावर नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण इतर लोकांनी असा दावा केला की हा त्यांनी शोधलेला पदार्थ नाही.

हे ही वाचा:

Uorfi Javed उर्फी जावेदला बिहारमधून धमकावत होता तरुण, मुंबई पोलिसांकडून अटक

Viral Love Story प्रेमाला मर्यादा नसतात असं म्हणतात, याचंच एक उदाहरण म्हणजे ‘हि’ जोडी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss