spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Covid 19 कोरोनाचा कहर ! BF.7 Variant ची लक्षणं घ्या जाणून

चीनमध्ये (China) कोरोना व्हायरस (Coronavirus In China) पुन्हा एकदा झपाट्यानं पसरत आहे. समोर आलेल्या एका अहवालानुसार, Omicron चं सब-व्हेरियंट BF.7 हे चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं होत असलेल्या वाढीमागील प्रमुख कारण आहे.

Covid Variant BF.7 : चीनमध्ये (China) कोरोना व्हायरस (Coronavirus In China) पुन्हा एकदा झपाट्यानं पसरत आहे. समोर आलेल्या एका अहवालानुसार, Omicron चं सब-व्हेरियंट BF.7 हे चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं होत असलेल्या वाढीमागील प्रमुख कारण आहे. या सब-व्हेरियंटमुळे आता भारत सरकारचीही चिंता वाढली आहे. भारतात आतापर्यंत BF.7 ची चार प्रकरणं आढळून आली आहेत. गुजरात आणि ओदिशात प्रत्येकी २ प्रकरणं समोर आली आहेत. जाणून घेऊयात, BF.7 सब-व्हेरियंटची सविस्तर माहिती .

चीनच्या मंगोलिया प्रांतात BF.7 चा रुग्ण आढळला. नंतर अवघ्या काही दिवसांत संपूर्ण चीनमध्ये BF.7 ने बाधीत रुग्ण आढळू लागले. आता चिनी नागरिकांच्या संपर्कात आलेल्या जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये या विषाणूने बाधीत रुग्ण आढळत आहेत. अमेरिका, यूके, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, डेन्मार्कमध्ये BF.7 ने बाधीत रुग्ण आढळले आहेत. वैज्ञानिकांच्या ताज्या अहवालानुसार, चीनमध्ये BF.7 या कोरोना विषाणूच्या अवताराची बाधा लाखो नागरिकांना वेगाने होत आहे. आतापर्यंत कोरोना विषाणूचे जेवढे अवतार कळले आहेत त्यापैकी हा अवतार सर्वाधिक वेगाने संसर्ग पसरणारा आहे. याच कारणामुळे चीनमध्ये कोरोनाची तीव्रता वाढत आहे.

BF.7 हा Omicron च्या BA.5 व्हेरियंटचा सब-व्हेरियंट आहे. याचा प्रसार अधिक वेगानं होण्याची शक्यता असून याचा इनक्यूबेशन कालावधीही कमी आहे.

सब-व्हेरियंट BF.7 बद्दल सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे, ज्यांना कोरोनाची लस मिळाली आहे अशा लोकांना देखील या व्हेरियंटची लागण होऊ शकते.

BF.7 या कोरोना विषाणूच्या अवताराच्या स्पाइक प्रोटीनमध्ये विशिष्ट प्रकारचे म्युटेशन झाले आहे. यामुळे BF.7 याची बाधा झालेल्या शरीरात वेगाने अँटीबॉडी (रोगप्रतिकारक क्षमता) विकसित होत नाहीत. ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत आहे अशांना BF.7 या कोरोना विषाणूची बाधा होण्याचा मोठा धोका आहे.

एखाद्या व्यक्तीला BF.7 या कोरोना विषाणूची बाधा झाली तर ती व्यक्ती आणखी किमान १५ ते २० जणांना याच विषाणून बाधीत करू शकते. यामुळे BF.7 चा संसर्ग वेगाने पसरत आहे.

तब्येत बिघडल्यास नागरिकांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि डॉक्टरांकडे जाताना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरावा अशा स्वरुपाचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार करू नये असेही आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

BF.7 विषाणूचा संसर्ग झाल्यास आढळणारी प्रमुख लक्षणे :

  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • दम लागणे
  • थकवा येण
  • ताप येणे
  • वारंवार खोकला येणे
  • घसा खवखवणे
  • नाक वाहणे (सर्दी)
  • छातीत दुखणे
  • पोटात दुखणे
  • थंडी वाजणे

हे ही वाचा:

‘या’ व्यक्तीने लावला होता Chicken Tikka Masala चा शोध, वयाच्या ७७व्या वर्षी झाले निधन

फोन टॅपिंग प्रकरणात सरकार दोषींना पाठीशी का घालत आहे? भर विधानसभेत काँग्रेसचा सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss