spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वर्ध्यात भाजी विक्रेत्याचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पहा व्हिडिओ

भाजीवाला नाल्याच्या पाण्यात भाजी धुताना कॅमेरात कैद झाला आहे.

वर्धा : हिंगणघाट शहरात चक्क नाल्याच्या पाण्यात भाजी विक्रेता भाजी धुताना चा व्हिडिओ कॅमेरेर्‍यात कैद झाला आहे. भाजी विक्रेत्याकडून नागरिकांच्या आरोग्याची खेळ केला जात असल्याचं या व्हिडिओ मधून स्पष्ट झालं आहे. व्हिडिओ मधील घटना स्थळ शहरातील मनसे चौक येथील आहे. तेव्हा प्रशासन काय कारवाई करणार ? यापुढे भाजी खरेदी करताना लोकांना आता विचार करावा लागणार आहे.

हेही वाचा :

आई मुलीला एका कागदाच्या सहाय्याने शिकवते आयुष्याचे धडे

 

हा व्हिडिओ मनसे चौक येथील असून हा भाजीवाला नाल्याच्या पाण्यात भाजी धुताना कॅमेरात कैद झाला आहे. तेव्हा शहरातील जनतेने भाजी विकत घेताना पुढे कुठली काळजी घ्यावी ? कुणावर विश्वास ठेवला पाहिजे ? असे गंभीर प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेक नागरिक आरोग्याविषयी चिंतेत पडले आहेत. या आधी अनेकजणांनी त्या भाजी विक्रेत्याकडून अनेकवेळा भाजी विकत घेतल्याच समजतय, त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न इथे उपस्थित होतो. गल्लीबोळातल्या भाजीवाल्यांवर विश्वास ठेवून हे नागरिक निसंकोचपणे भाजी घरेदी करतात. पण ह्या घटनेने हिंगणघाट शहराला अस्वस्थ केले आहे.

 

शहरात प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक चौकात, प्रत्येक वॉर्ड मध्ये, प्रत्येक प्रभागात भाजी विक्रेते उभे असतात. परंतू घडलेल्या प्रकारामुळे आता भाजीविक्रेते हे नागरिकांच्या आरोग्याशी कसे खेळ करतात हे समोर आलेले असताना देखील या बाबत प्रशासनाकडून दखल घेतली जाते का ते पाहावं लागेल. त्या भाजी विक्रेत्यावर प्रशासन कोणती कारवाई करते की या ही पुढे देखील जनतेलाच ही काळजी घ्यावी लागेल हे महत्वाचं आहे. असेच विचित्र प्रकार इतर भाजीवाले तर करत नाही ना हाही प्रश्न आता नागरिकांच्या मनात येऊ लागला आहे. यावर योग्य त्या कारवाई ची अपेक्षा नागरिकांना आहे. तेव्हा हिंगणघाट प्रशासन जनतेच्या हितासाठी काय काय प्रयत्न करणार हेच बघावं लागणार आहे.

Latest Posts

Don't Miss