spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पौष्टीक गाजर आणि बीट सॅलड रेसिपी जाणून घ्या

रोजच्या जेवणात आपण कोशिंबीर, भाजी, आमटी या पदार्थाचे सेवन करतो. सॅलड मध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळून येते जे आरोग्यासाठीफायदे ठरते. सॅलड खाणे अतिशय चांगले असते. कोशिंबीरी सेवन केल्याने पोट भरण्यास मदत होते. आणि फायबर असल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत देखील होते, म्हणून आहारात कोशिंबीरचा समावेश करून घ्यावा. आपण सॅलड बनवताना त्यावर मीठ वगरे टाकून खातो पण हे खाऊन कंटाळा येतो.

सॅलड बनवतांना त्यामध्ये धणे पावडर, मिरची किंवा इत्यादी पदार्थ टाकून सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. अशावेळी थोड्या वेगळया पद्धतीने आणि चविष्ट असे सॅलड किंवा कोशिंबीर बनवली तर जेवताना एक वेगळीच चव येते, आणि खाताना देखील कंटाळा येत नाही, तसेच गाजरात व्हिटॅमिन्स,(Vitamins) मिनरल्स (Minerals) अँटी ऑक्सिडंट (Anti-oxidant) आणि बिटा केरोटीन (Beta protein) असतात आणि बीटरूट मध्ये अल्फा-लिपोइक एसिड असते (Alpha-lipoic acid). तसेच बीटरुट मध्ये अँटीऑक्सिडंट (Antioxidant) देखील असते. ज्यामुळे त्वचेतील कोलेजनची (collagen) पातळी वाढण्यास मदत होते. आणि त्वचा सुंदर होते.

 

साहित्य –

बीट गरजेनुसार

गाजर गरजेनुसार

मायोनिज अर्धी वाटी

मीरपूड पाव चमचा

मीठ चवीनुसार

साखर अर्धा चमचा

डाळींबाचे दाणे अर्धी वाटी

कोथिंबीर पाव वाटी

कृती :

सर्व प्रथम बीट आणि गाजर स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचे साल काडून घ्या, साल काडून झाल्यानंतर ते चांगले किसून घ्या.
नंतर त्यामध्ये मीठ, साखर मिरपूड घालून घ्या.
नंतर त्यामध्ये डाळींबाचे दाणे , मायोनिज घालून एकत्रित मिश्रण करून घ्या.
त्यानंतर शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या.
तसेच हे सॅलड तुम्ही पोळी सोबत देखील खाऊ शकता, आणि लहान मुलांना देखील देऊ शकता. तसेच लहान मुलांच्या आरोग्यासाठी सॅलड खूप फायदेशीर आहे. याचे नेहमी नियमितपणे सेवन करणे, असे केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतील आणि आरोग्य सुधारण्यास देखील मदत होईल.

 

हे ही वाचा:

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

दुधासोबत मधाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी गुणकारक ठरेल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss