spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारतात BF.7 Variant चे ४ रुग्ण, आरोग्य मंत्र्यांची बोलावली महत्वाची बैठक, जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

चीनमध्ये कोरोनाचा प्रचंड प्रकोप वााढला आहे. त्यामुळे चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसे न् दिवस वाढत आहे. चीनमध्ये उडालेल्या या हाहाकारामुळे भारत सरकार अँलर्ट झालं आहे.

Covid-19 Alert for India : चीनमध्ये कोरोनाचा प्रचंड प्रकोप वााढला आहे. त्यामुळे चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसे न् दिवस वाढत आहे. चीनमध्ये उडालेल्या या हाहाकारामुळे भारत सरकार अँलर्ट झालं आहे. देशातील सर्वच राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. तसेच कोरोना रोखण्यासाठी केंद्रीय पातळीपासून ते राज्य स्तरावर उच्च स्तरीय बैठका घेतल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. भारतामध्ये ओमायक्रॉनच्या (Omicron) BF.7 या सबव्हेरियंटचे (BF.7 Variant) ४ रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे भारत सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya ) आज २३ डिसेंबर रोजी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं की, ‘आम्ही कोरोनाच्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहोत. सध्या चीन आणि भारतामध्ये थेट विमानसेवा नाही पण लोक इतर मार्गाने भारतात येत आहेत. अशा परिस्थितीत नवा विषाणू भारतात प्रवेश करू नये आणि नागरिकांना प्रवासातही कोणताही अडथळा येणार नाही यावरही आम्ही भर देत आहोत. तसेच कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारकडून बैठका घेण्यात येत आहेत. गुरुवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालीही महत्त्वाची कोरोना आढावा बैठक पार पडली. केंद्र सरकारने कोरोनाबाबत अनेक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

भारतात आता नेझल कोरोना वॅक्सिन म्हणजेच नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोरोना लसीला (Nasal Corona Vaccine) मंजुरी देण्यात आली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या समितीकडून नाकावाटे दिली जाणारी कोरोना लस वापरण्यास परवानगी दिली आहे. जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून ओमायक्रॉन आणि त्याचा BF.7 सबव्हेरियंट याचा वेगाने संसर्ग होत आहे. भारतातही ओमायक्रॉनच्या सबव्हेरियंटचे चार रुग्ण सापडल्याने भारत सरकार अलर्टवर आहे.

हे ही वाचा:

IPL 2023 च्या मिनी लिलावासाठी सर्व सज्ज.. BCCI ने स्टार हॉटेलमध्ये केले दोन मजले बुक

IPL 2023 Mini Auction मध्ये दिसणार सनरायझर्स हैदराबादचा लक्ष्यवेधी चेहरा, जाणून घ्या नक्की कोण आहे हा चेहरा?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss