spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Raj Thackeray काही दिवसांनी हे पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरवेल, राज ठाकरेंनी दिला इशारा

महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या नागपूर दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे. सध्या राज्य विधीमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. त्यातच राज ठाकरे यांचा नागपूर दौरा आहे. त्यामुळे राज यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपा, शिवसेनेचा प्रवास सांगत खचू नका असं सांगितलं.

हेही वाचा : 

Mukta Tilak यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राज ठाकरेंनी पक्षाच्या विस्तारासाठी स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. यावेळी नवीन शाखाध्यक्षांना नियुक्ती पत्र देखील दिले. सायंकाळपर्यंत वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांच्या पक्षीय बैठका होणार आहेत. दरम्यान हिवाळी अधिवेशनामुळं सर्वच राजकीय पक्षांचे नेते नागपुरात (Nagpur) आहेत. त्यामुळे आता या दौऱ्यात कोणत्या राजकीय नेत्यांची भेट घेणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.याआधी सप्टेंबर महिन्यातही राज ठाकरे यांनी नागपूर दौरा केला होता.

राज ठाकरे यांनी पक्ष उभारणीसाठी कार्यकर्तांना कानमंत्र देताना म्हटले, कोणत्याही पदावर असलात तरी दुसऱ्याला कधी तुच्छ लेखू नका. यातून हातात काही लागणार नाही, पण तुमचीच बर्बादी होईल. आज तुमच्याकडे फक्त पद आहे. दुसरी माणसं नव्हती म्हणून तुम्हाला पद दिलं असं नाही. तुम्हाला निवडून हे पद देण्यात आलं आहे. त्या पदाची जबाबदारी ओळखा. कधी कोणाला तुच्छ लेखू नका,” असा सल्ला ठाकरेंनी दिला.

आदित्यनंतर उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ, दिशा सालियन प्रकरणात गुप्तचर विभागाकडून होणार चौकशी

राज ठाकरे पुढं म्हणाले की, प्रत्येक राजकीय पक्ष या फेजमधून जातोच. पूर्वी विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता भाजपचा झाला. या फेज येतात. काही कालांतराने दुसरी माणसं येतात. कारण लोकही कंटाळतात. आजपण ज्यांच्या नियुक्त्या झाल्या त्यांच्याविषयी लोक म्हणतील हे पोट्ट काय करणार? पण हेच पोट्ट तुमच्यावर वरवंटा फिरवणार. ज्यांच्या नियुक्त्या झाल्या त्यांच्याकडून मला कामाच्या अपेक्षा आहे. यश येऊ किंवा अपयश येवो, पराभवाने खचून जावू नका, असंही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना म्हटलं.

2023 IPL Auction आयपीएलच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! २०२३ आयपीएल लिलावाला आज होणार सुरुवात

Latest Posts

Don't Miss