spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IPL Auction 2023 पहा कोणते खेळाडू लिलावात राहिले अनसोल्ड !, जाणून घ्या अपडेट एका क्लिकवर…

IPL Auction 2023 LIVE Updates : जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2023) आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आज आयपीएलचा मिनी लिलाव कोची येथे पार पडत आहे. यासाठी जगभरातील 405 खेळाडू रिंगणात असणार आहेत. यावेळी लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीन आणि इंग्लंडचे अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स, सॅम कुरन यांच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. तसेच भारतातील अनेक युवा खेळाडू पहिल्यांदाच आयपीएल लिलावाच्या रिंगणात असणार आहेत. यंदाच्या आयपीएल लिलावात एकूण ४०५ खेळाडू भाग घेणार आहेत. यातील २७३ भारतीय आणि १३२ विदेशी खेळाडू आहेत. यातील कॅप्ट खेळाडू हे ११९ तर २८२ अनकॅप्ट खेळाडू आहेत. याचबरोबर ४ असोसिएट देशाचे खेळाडू या लिलावात भाग घेणार आहेत. जरी हा लिलाव मिनी लिलाव असला तरी जागतिक स्तरावरील अनके मोठे खेळाडू, अष्टपैलू खेळाडू या लिलावात हॅमरखालून जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मोठी बोली लागू शकते.

बेन स्टोक्स

बेन स्टोक्ससाठी लखनौ सुपर जायंट आणि सनराईजर्स हैदराबादने बोली लावण्यास सुरूवात केली. त्यांनी इंग्लंडच्या कसोटी कर्णधाराला १५ कोटींपर्यंत नेले. त्यानंतर चेन्नईने लिलावात उडी घेतली. अखेर सीएसकेने १६.२५ कोटीला त्याला खरेदी केले.

कॅमेरून ग्रीन

ऑस्ट्रेलियाचाअष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनसाठी पहिल्यापासूनच आक्रमकपणे बोली लावली जात होती. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सने त्याला १५ कोटींपर्यंत पोहचवले. दिल्ली आणि मुंबईमध्येच त्याला आपल्या गोटात खेचण्यासाठी रस्सीखेच सुरू होती. अखेर मुंबई इंडियन्सने त्याला 17.50 कोटीला आपल्या गोटात खेचले.

अजिंक्य राहणे

एकेकाळी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असणाऱ्या अजिंक्य रहाणेला केवळ ५० लाखांना चेन्नई सुपरकिंग्सने विकत घेतलं आहे.

मयंक अगरवाल

पंजाब किंग्सचा माजी कर्णधार मयांक अगरवाल याला सनरायझर्स हैदराबादने २.२५ कोटींना विकत घेतलं आहे.

मुकेश कुमार

मुकेश कुमारसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांनी जोरदार बॅटिंंग केली. अखेर दिल्ली कॅपिटल्सने त्याला ५.५० कोटीत खरेदी केले.

निकोलस पूरन

निकोलस पुरनला लखनौ सुपर जायंटने १६ कोटी रूपयाला खरेदी केले.

केन विल्यमसन

सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार केन विल्यमसन याला गुजरात टायटन्स संघानं २ कोटींना खरेदी केलं आहे.

अनसोल्ड खेळाडू

जो रूट – १ कोटीरिले रोसो – २ कोटीशाकिब अल हसन – १.५ कोटी

हे ही वाचा : 

Raj Thackeray काही दिवसांनी हे पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरवेल, राज ठाकरेंनी दिला इशारा

Mukta Tilak यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss