spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो मार्ग ५ च्या दुसऱ्या टप्प्याचं काम होणार सुरू

नव्या वर्षात मेट्रो १२ सह मेट्रो ५ च्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू होणार आहे. कल्याण ते तळोजा (Kalyan to Taloja) मेट्रो १२ मार्गिकेसह ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ च्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

नव्या वर्षात मेट्रो १२ सह मेट्रो ५ च्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू होणार आहे. कल्याण ते तळोजा (Kalyan to Taloja) मेट्रो १२ मार्गिकेसह ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ च्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. MMRD कडून तयारी सुरू झाली आहे.

मेट्रो मार्ग ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) या मर्गिकेतील ठाणे ते भिवंडी दरम्यान १२.७ किमी चा पहिला टप्पा प्रगतीपथावर आहे. यामध्ये एकूण ६ स्थानकं आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असणार आहेत. मार्गिकेच्या या टप्प्यातील स्थानकांची ६४ टक्के आर्किटेक्चरल कामं पूर्ण झाली आहेत. एकूण ७० टक्के इतकं काम पूर्ण झालं आहे. मेट्रो मार्ग ५ च्या मार्गात कशेळी येथे ५५० मीटर लांबीची खाडी आहे. याच खाडीवर मेट्रोचा पूल उभरण्याकरता सेगमेंटल बॉक्स गर्डर या पद्धतीचा वापर करून एकूण १३ स्पॅन उभारण्यात येणार आहेत. सध्यस्थितीत ८ स्पॅनची उभारणी पूर्ण झाली आहे. या प्रत्येक स्पॅनची लांबी सुमारे ४२ मी इतकी असेल.

मेट्रो मर्गिका ५ च्या पहिल्या टप्प्यात घोडबंदर रोड वरील कापूरबावडी (मेट्रो ४ आणि ५ चे एकत्रीकृत स्थानक), बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा आणि धामणकर नाका (भिवंडी) या स्थानकांचा समावेश आहे. मेट्रो मार्गिका ५ चा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी दरम्यान कनेक्टटेड असेल. ज्यामुळे नागरिकांना वाहतुकीची एक नवीन आणि पर्यावरण पूरक व्यवस्था उपलब्ध होईल. तसेच उपनगरीय रेल्वे, बेस्ट/ टीएमसी बस सेवा यांसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील भार कमी होण्यास मदत होईल. ही मार्गिका कार्यान्वित झाल्यावर प्रवासाच्या वेळेत साधारणतः २० मिनिटांची बचत होईल.

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी बोलताना सांगितलं की, “मेट्रो मार्गिका ५ साठी कशेळी येथे सेंट्रलाइज्ड डेपो साठी जागा निश्चित करण्यात आली असून भूसंपादन आणि निविदा प्रक्रियांचं काम प्रगतीपथावर आहे. या मर्गिकेतील अंजूरफाटा येथे रेल्वे ओव्हर ब्रीज करता स्पेशल स्टील गर्डर स्पॅन बसवण्यात येणार आहेत, ज्याचं काम लवकरच सुरू होईल.”

हे ही वाचा:

IPL 2023 च्या मिनी लिलावासाठी सर्व सज्ज.. BCCI ने स्टार हॉटेलमध्ये केले दोन मजले बुक

IPL 2023 Mini Auction मध्ये दिसणार सनरायझर्स हैदराबादचा लक्ष्यवेधी चेहरा, जाणून घ्या नक्की कोण आहे हा चेहरा?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss