spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

New Year ख्रिसमस-थर्टी फर्स्ट निमित्त ‘हे’ तीन दिवस दारुची दुकानं पहाटे पाचपर्यंत सुरू राहतील

डिसेंबर महिन्याचा अखेरचा आठवडा सुरु आहे. त्याचबरोबर नवीन वर्ष (Thirty first) आणि ख्रिसमस (christmas) दोन्हीच्या निमित्ताने दारू पिणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच वाढ होते. अशा मद्य प्रेमींसाठी आता राज्य सरकारने महत्त्वाचा मोठा निर्णय घेतला आहे. यंदा नववर्ष आणि ख्रिस्तमसच्या पार्श्वभूमीवर राज्यातली दारूची दुकाने पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यप्रेमींसाठी ही मोठी घोषणा केली असून, या घोषणेनुसार २४ डिसेंबर, २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर असे तीन दिवस दारुची दुकाने पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू (New Year) असतील. एरवी रात्री ११ वाजेपर्यंत दारुची दुकानं खुली ठेवण्यास सरकारची परवानगी आहे.

हेही वाचा : 

Maharashtra Assembly Winter Session 2022 विधानमंडळाच्या गेटवर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

Latest Posts

Don't Miss