spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bigg boss 16 ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खाननं शालीन भानोट आणि एमसी स्टॅनची घेतली शाळा, पहा काय म्हणाला भाईजान

बिग बॉसमध्ये जेव्हा जेव्हा वीकेंड वार येते तेव्हा नामांकित स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार लटकते. बिग बॉसचा सीझन 16 हा पहिला (Bigg boss 16) सीझन आहे ज्यामध्ये सुमारे तीन महिन्यांत फक्त 4 स्पर्धकांना घरातून बाहेर काढण्यात आले आहे. आता बातमी येत आहे की यावेळी शोमधील सर्वात मजबूत स्पर्धकाला सलमान खानने बाहेर काढले आहे आणि हे सर्व मतदानाच्या आधारे नाही तर कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेनुसार घडले आहे.

हेही वाचा : 

Bigg Boss Marathi 4 प्रसाद जवादेची आई घरात येताच सर्व सदस्यांच्या डोळ्यात आले आश्रू ,पहा नेमकं काय झालं

‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सलमान खान प्रत्येकाच्या चांगल्या-वाईटाचा उल्लेख करताना दिसत आहे. आधी ते स्पर्धकाला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतरही त्यांच्यात सुधारणा झाली नाही तर त्यांची ते शाळा घेतात. सलमान खानने शालीन भानोत आणि एमसी स्टेन यांनाही अनेकदा प्रेमाने समजावून सांगितले आहे. पण या आठवड्यात शालीन आणि स्टेन यांच्यातील भांडणामुळे सलमान नाराज झाला. वीकेंड का वारचा प्रोमो रिलीज झाला आहे. प्रोमोमध्ये सलमान शालीन आणि स्टेनला फटकारताना दिसत आहे. या दोघांशी संवाद साधताना सलमान खान म्हणतो, ‘तुमच्या दोघांच्या वागण्यामुळे तुमच्या आई आणि बहिणींवर शिव्या का देत आहेत. यावर शालीन ‘सॉरी सर’ म्हणतो. सलमान रागाने त्याची माफी स्वीकारत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bigg Boss khabri 💥 (@mr_khabariii)

Maharashtra Assembly Winter Session 2022 विधानमंडळाच्या गेटवर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

या आठवड्यात स्पर्धकांनी प्रियंका चहर चौधरीला वेगळे करण्यासाठी एकत्रितपणे एक ठरवली आहे. त्यामुळे अंकित गुप्ताला या अंतर्गत नामांकन देण्यात आले. तथापि, बिग बॉसने प्रियांकासमोर एक पर्याय ठेवला की तिला हवे असल्यास, ती जिंकलेल्या रकमेतून २५ लाख रुपये गमावून अंकितला नॉमिनेशनपासून वाचवू शकते. थोडा विचार केल्यावर प्रियांकानेही तेच केले. तिने तिचा खास मित्र अंकित गुप्ता याला वाचवले पण त्याला बेघर होण्यापासून वाचवता आले नाही.

Latest Posts

Don't Miss