spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mega Block रविवारी ‘या’ रेल्वे मार्गावर असणार मेगाब्लॉक

मुंबई लोकल म्हणजेच मुंबई मुंबईकरांची जीवन वाहिनी आहे. जर लोकलच्या वेळापत्रकात अचानक जरा जरी बदल झाला तर लाखो मुंबईकरांची दिनचर्या खोळंबतेच. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. २५ डिसेंबर म्हणजेच रविवारी मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. कारण उपनगरीय रेल्वे मार्गावरीळ रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणांची दुरुस्ती करण्यात येणार आहे त्यामुळे हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मुंबईतील अन्य तीन मार्गांवर देखील परिणाम होणार आहे. त्यामध्ये मध्य (Central Railway), पश्चिम (Western Railway) आणि हार्बरच्या (Harbour Railway) या मार्गांचा समावेश आहे.

रविवारी २५ डिसेंबरला लोकलचा वेळ पुढील प्रमाणे असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानक या दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकावर थांबून या गाड्या पुढे पुर्ववत डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर सकाळी १०.१४ ते दुपारी ३.५२ या वेळेत घाटकोपर मधून सुटणाऱ्या अप धीम्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील. वडाळा रोड- मानखुर्द अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत मेगाब्लॉकमुळे येथील गाड्या वर प्रभाव पडेल. आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे/गोरेगाव सेवा मेगाब्लॉकमुळे प्रभावित होणार नाही. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.४० ते दुपारी ३.२८ पर्यंत सुटणाऱ्या गाड्या या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.५४ वाजेपर्यंत सुटणाऱ्या पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

मुंबई लोकलच्या मेगा ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वांद्रे/गोरेगाव दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा या नियमित वेळापत्रकानुसार असतील.

हे ही वाचा:

Prajakta Mali ब्लू शोल्डर टॉप आणि ब्लॅक पॅन्ट मध्ये ही अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे

मुंबई इंडियन्सला मिळाली कायरन पोलार्डची रेप्लासिमेंट

New Year ख्रिसमस-थर्टी फर्स्ट निमित्त ‘हे’ तीन दिवस दारुची दुकानं पहाटे पाचपर्यंत सुरू राहतील

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss