spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Blast News मोतिहारीमध्ये वीटभट्टीच्या चिमणीत भीषण स्फोट, ७ ठार,२० हून अनेक जखमी

बिहारमधील (Bihar) मोतिहारी येथे वीटभट्टीला आग लावत असताना चिमणीचा स्फोट झाला. या अपघातात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. चिमणी मालकासह २० हुन अधिक कामगार जखमी झाले आहेत. सुमारे ६/७ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर २० लोक अद्याप बेपत्ता आहेत. अग्निशमन दलाच्या वाहनासह किमान १० रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही घटना रामगढवा पोलीस ठाण्याच्या नारीगिरीची आहे. मोतिहारीचे डीएम रवाना झाले असून ते घटनास्थळी रवाना झाले आहेत.

हेही वाचा : 

ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक

वीटभट्टीवर स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आला, असं आसपासच्या लोकांनी सांगितं. या अपघातानंतर एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केलं, असं बिहार पोलीस मुख्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. ठार झालेल्यांमध्ये ४ स्थानिक आणि ३ जण उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. पोलीस सहकार्य करत असून आवश्यक ती मदत करत आहेत.

Jaykumar Gore आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीला भीषण अपघात, गंभीर दुखापत

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान यांनी ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, “मोतिहारी येथील वीटभट्टीवर झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे व्यथित झालो आहे. पीएमएनआरएफ प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत जखमींना ५० हजार रुपये देण्यात येईल,असही मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Latest Posts

Don't Miss