spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Paris Olympics 2024 साठी फ्रान्स घेणार AI सुरक्षा आणि नियंत्रण पध्द्तीची मदत

मुख्यत्वे पॅरिस या शहरात ह्या शहरात ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

पॅरिसमधील उन्हाळी ऑलिंपिक २०२४ (Paris Olympics 2024) आता लवकरच आयोजित करण्यात येणार आहे . पॅरिसमधील २०२४ उन्हाळी ऑलिंपिकसाठी आता दोन वर्षांपेक्षा कमी वेळ उरला आहे. टोकियो ऑलिंपिक २०२० (Tokyo 2020 Olympics) साथीच्या रोगाचा प्रभाव लक्षात घेऊन वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आल्यानंतर, पारंपारिक प्रतीक्षा कालावधी कमी करून लवकरात लवकर पॅरिसमधील उन्हाळी ऑलिंपिक २०२४ (Paris Olympics 2024) आयोजित करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर फ्रान्सने (France) इतिहासातील सर्वोत्तम खेळ प्रदर्शन करण्यासाठी आणि सर्वोत्तम खेळ स्पर्धा आयोजित करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

फ्रान्समध्ये २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान ऑलिम्पिक खेळ होणार आहेत. मुख्यत्वे पॅरिस या शहरात ह्या शहरात ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. परंतु काही विशिष्ट खेळ खेळवण्यासाठी इतर फ्रेंच ठिकाणांचाही या स्पर्धेत समावेश करण्यात येणार आहे. उदाहरणार्थ, ताहिती (Tahiti) याठिकाणी भव्य सर्फिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल.

१९०८ आणि १९२४ नंतर पॅरिस उन्हाळी ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) आयोजित करण्याची ही तिसरी वेळ असेल. खेळांच्या इतिहासातील एक विलक्षण विकास घडवून आणणारा एक निर्णय फ्रान्सने घेतलाय आणि तो म्हणजे स्पर्धेदरम्यान लोकांची होणारी आवरण्यासाठी आणि सुरक्षा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी AI सुरक्षा आणि नियंत्रण पध्द्तीची मदत घेणे.

फ्रान्स ऑलिम्पिक (Olympics) खेळांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीची (AI-assisted) करणार वापर

एएफपीच्या वृत्तानुसार, फ्रान्स कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI-assisted) सहाय्याने गर्दी नियंत्रण प्रणाली लागू करण्यास तयार आहे . ऑलिम्पिक दरम्यान सर्वोच्च सुरक्षा उपाय करणे आणि कोणत्याही प्रकारची गुंतागुंत टाळणे हे मुख्य ध्येय आहे आणि अशा परिस्थिती AI महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडू शकते.

उदाहरणार्थ, ऑलिम्पिकसाठी काहीतरी नवीन करण्यासाठी , उद्घाटन समारंभ हा सीन नदीच्या किनारी एक ओपन-एअर कार्यक्रम म्हणून आयोजित केला जाईल. हजारो चाहत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, कृत्रिम बुद्धिमत्ता निश्चितपणे कोणतीही सुरक्षा योजना अपग्रेड करू शकते. २०२४ मध्ये उद्घाटन समारंभासाठी अंदाजे उपस्थिती पॅरिसमध्ये सुमारे ६ लाख लोक आहे .

यंत्रणा कशी काम करेल?

गोपनीयतेच्या समस्या लक्षात घेता, याक्षणी चेहर्यावरील ओळख (facial recognition) हा पर्याय वापरता येणे शक्य नाही. तथापि, अधिका-यांनी तयार केलेल्या योजनेत फुल-बॉडी स्कॅनर (full-body scanners) ही पध्द्त वापरली जाऊ शकते. या पद्धतीचा वापर केल्यास सुरक्षा कॅमेऱ्यांद्वारे, एआय सॉफ्टवेअर (AI software) संशयास्पद किंवा हिंसक वर्तन ताबडतोब शोधून त्यात सहभागी असलेल्या कोणाचेही स्थान आणि डेटा शोधून देऊ शकेल.

हे ही वाचा:

Bigg Boss 16 बिग बॉसच्या घरात प्रियंका चौधरीला ‘देवी’ असे संबोधलं गेलं, पहा नेमकं काय झालं

जुळ्या मुलांसह Isha Ambani मुंबईत दाखल, कुटुंबीयांनी केले जंगी स्वागत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss