spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Charles Sobhraj नेपाळच्या तुरुंगातून सुटल्यानंतर सीरियल किलर ‘चार्ल्स शोभराज’ची पहिला लूक

चार्ल्स शोभराजचा जन्म सायगॉन येथे झाला . ७८वर्षीय चार्ल्स शोभराजचा थायलंड, नेपाळ, अफगाणिस्तान, भारत, इराण, हाँगकाँग आणि तुर्कीमध्ये २० हून अधिक हत्यांशी संबंध आहे.फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराजची तब्बल २०वर्षांनंतर २३ डिसेंबर रोजी नेपाळमधील तुरुंगातून सुटका करण्यात आली. ‘सर्प’ (the serpent)आणि ‘बिकिनी किलर’ ( bikini killer)म्हणून ओळखला जातो . त्यानंतर त्याला दोहामार्गे पॅरिसला घेऊन जाणार्‍या विमानात बसवले . आईने दुसरं लग्न केल्यानंतर शोभराजचं बालपण फ्रान्समध्ये गेलं. त्यांचा जन्म सायगॉन येथे झाला, ज्याला आता हो ची मिनी सिटी म्हणून ओळखले जाते,त्याची आई व्हिएतनामी होती आणि वडील भारतीय .

 हेहि वाचा : 

Maharashtra Shahir ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमातील साने गुरुजींचा पहिला लूक आऊट

थायलंड, नेपाळ, अफगाणिस्तान, भारत, इराण, हाँगकाँग आणि तुर्कस्तानमध्ये शोभराजचा (Charles Sobhraj)२० हून अधिक हत्यांशी संबंध आहे. तो तरुण बॅकपॅकर्सना टार्गेट करायचा, रत्नांचा, हिऱ्यांचा व्यापारी असल्याचा दावा करून त्यांना आमिष दाखवायचा आणि नंतर त्यांची हत्या करायचा. त्याच्या पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी तो हत्याकरकाच्या पुरुष व्यक्तीचा पासपोर्ट घेऊन जाई .त्याची पहिली पुष्टी झालेली शिकार थायलंडमधील एक तरुण अमेरिकन महिला होती. तिचा मृतदेह पट्टाया येथील समुद्रकिनाऱ्यावर सापडला होता. भारताच्या तिहार तुरुंगात त्यांनी दोन दशके( two decade ) घालवली. तथापि, १९९७ मध्ये, त्यांना कोणतेही शुल्क न घेता फ्रान्सला पाठवण्यात आले आहे. २००३ मध्ये शोभराज नेपाळमध्ये दिसला, जिथे त्याने बनावट ओळख वापरून निर्यात (export import) कंपनी सुरू केली. पण त्याचे पितळ लवकरच उघडले , शिवाय १९७५ मध्ये दोन पर्यटकांना मारल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली.

Tirumala Tirupati Devasthanam दर्शनासाठी तिकिटांची मागणी वाढली, ४० मिनीटात सर्व तिकिटांची झाली विक्री

२००४ मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्याची रवानगी काठमांडू तुरुंगात केली होती .या आठवड्याच्या सुरुवातीला, नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने आरोग्य आणि चांगल्या वर्तनाच्या कारणामुळे त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले.”मला खूप छान वाटतंय.. मला खूप काही करायचं आहे,” शोभराजने वृत्तसंस्था एएफपीला सांगितलं. “मला बर्‍याच लोकांवर खटला भरावा लागेल. नेपाळ राज्यासह.” अस हि तो म्हणाला .

Latest Posts

Don't Miss