spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पंकज त्रिपाठी साकारणार अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका , पोस्ट होतेय व्हायरल

प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हा कायम चर्चेत असतो. पंकज त्रिपाठी हा त्याच्या मिर्झापूर (Mirzapur) , सॅक्रेड गेम्स (Sacred Games), क्रिमिनल जस्टीस (Criminal Justice) या मालिकां मुळे प्रचंड चर्चेत आला होता. पंकज त्रिपाठी हा कायम त्याच्या अभिनयामुळे आणि त्याने मालिकेत केलेल्या त्याच्या भूमिकेच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे प्रचंड चर्चेत असतो. पंकज त्रिपाठीच्या प्रत्येक मालिकेला आणि त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रेतिसाद मिळालेला आपण पहिले आहे. तर सध्या पंकज त्रिपाठी हा त्याच्या एका सोशलमिडीया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. आता प्रेक्षकांना पंकज त्रिपाठी हा अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) याच्या भूमिकेत दिसणार आहे. पंकज त्रिपाठीनं एका नव्या पोस्टच्या माध्यमातून ‘मै अटल हूं…’ या आपल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील बायोपिकचं नाव सांगत लवकरच हा सिनेमा आपल्या भेटीस येतोय हे सूचित केलं आहे.

अभिनेता पंकज त्रिपाठे (Pankaj Tripathi) हा सोशलमिडीयावर फारसे स्कॅरीय नसतात. पण त्यांच्या या एका पोस्ट मुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. पंकज त्रिपाठीने त्याच्या पोस्ट मध्ये असे लिहिलं आहे की ‘ मनात रोमांच दाटून आलाय, थोडीशी भीती देखील वाटतेय,मनात अनेक भावनांचा कल्लोळ आहे, पण सिनेमाप्रतीची निष्ठा बळ वाढवतेय. आणि हा सगळा उत्साह अटलजींना समर्पित… मै अटल हूं..लवकरच येतोय.” असे पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यानी त्याच्या पोस्ट मध्ये लिहिले आहे. त्यामुळे पंकज त्रिपाठीने हे जाहीर रित्या सांगितले आहे की त्याच्या आगामी ‘मै अटल हूं’ या चित्रपटात अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) याची भूमिका साकारणार आहे. अभिनेता पंकज त्रिपाठी याचे वैशिठ्य असे आहे की पंकज त्रिपाठीने साकारलेल्या भूमिकेवरून पंकज त्रिपाठीला ओळखले जात. म्हणजेच त्याचा अभिनय आणि उत्कृष्ट सादरीकरण हे त्याने साकारलेल्या पात्राला सत्यात आणते. त्यात आता प्रेक्षकांना पंकज त्रिपाठी भारताचे माजी पंत प्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) अभिनित बायोपिकचे दिग्दर्शन मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav ) करत आहेत. यात पंकज त्रिपाठी अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.‘ द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशन अ‍ॅण्ड पॅराडॉक्स’ या पुस्तकावर आधारित चित्रपटाची कथा असणार आहे. चित्रपटाच्याबाबतीत इतर माहिती लवकरच समोर येईल.

हे ही वाचा : 

भाजपा माजी खासदारचं मोठं वक्तव्य, शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक

सीमावादावर राज्यपालांची अमरावतीमध्ये महत्वाची बैठक

ऐन Christmas च्या हंगामात अमेरिकेत धडकणारा ‘Bomb Cyclone’ आहे तरी काय?

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss