spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ख्रिसमसच्या निमित्ताने BTS V ने चाहत्यांना दिली एक खास भेट, भेटीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर होतोय व्हायरल

किम तेह्युंग (Kim Taehyung) म्हणजेच व्हीने (V) त्याच्या चाहत्यांना म्हणजेच BTS Armyला ख्रिसमस निमित्त (Christmas 2022) एक खास भेट दिली आहे.

ख्रिसमसच्या (Christmas 2022) या पूर्वसंध्येला सर्वत्र ख्रिसमस साजरा करण्यासाठी लोकांची सुरू असणारी लगबग आणि तयारी दिसून येत आहे आणि अशातच जगभर प्रसिद्ध असणारा के – पॉप (K – Pop) ग्रुप BTS चा सदस्य असणाऱ्या किम तेह्युंग (Kim Taehyung) म्हणजेच व्हीने (V) त्याच्या चाहत्यांना म्हणजेच BTS Armyला ख्रिसमस निमित्त (Christmas 2022) एक खास भेट दिली आहे. व्हिने (V) १९५१ चं सुप्रसिद्ध गाणं इट्स बिगिनिंग टू लूक अ लॉट लाईक ख्रिसमस हे गाणं (It’s Beginning to Look a Lot Like Christmas) त्याच्या आवाजात गाऊन २३ डिसेंबर (23 December) रोजी यूट्यूबवर (YouTube) अपलोड केलं आहे.

यूट्यूबवर (YouTube) गाणं अपलोड करून झाल्यावर त्याची एक छोटीशी झलक त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. शेअर करत असताना त्याने एक छोटंसं कॅप्शन देखील लिहिलं आहे. त्याने लिहिलं की, “आर्मीसाठी माझ्याकडुन एक ख्रिसमसची भेट.” (Christmas gift from me to armys). या व्हिडिओत व्ही (V) निळ्या रंगाच्या ओवरसाइज्ड हूडीमध्ये दिसला. तसेच गाणं गात असताना त्याने त्याचा पोमेरानियन येओनटामला (Yeontan) देखील उचलून घेतले होते.

दरम्यान, व्ही (V) आणि त्याचे सहकारी बीटीएस सदस्य (BTS) आरएम (RM), जिन (Jin), जिमीन(Jimin), सुगा (Suga), जे-होप (J-Hope) आणि जंगकूक (Jungkook) यांच्यासाठी हे वर्ष खूपच महत्त्वाचे आहे. गटाने त्यांचा अल्बम रिलीज केला परंतु त्यानंतर लवकरच त्यांनी घोषणा केली की ते एक विश्रांती घेतील आणि त्यांच्या एकल प्रकल्पांवर (Solo Album) काम करतील. जंगकूकने चार्लियर पुथसह त्याचे लेफ्ट अँड राईट गाणे रिलीज केले तर जे-होप आणि आरएमने त्यांचे अल्बम रिलीज केले. तथापि, चाहत्यांना मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा हे घोषित करण्यात आले की सर्वात ज्येष्ठ सदस्य किम सेओकजिन उर्फ ​​जिन दक्षिण कोरियाच्या अनिवार्य लष्करी सेवेसाठी रवाना होणार आहे. त्याच्या पाठोपाठ इतर सदस्य देखील लष्करी सेवेत लवकरच रुजू होणार आहेत.

हे ही वाचा:

Elon Musk ने घेतला मोठा निर्णय, Twitterवर आणखी एक बदल करत काढून टाकले ‘हे’ महत्वाचे फिचर

Charles Sobhraj नेपाळच्या तुरुंगातून सुटल्यानंतर सीरियल किलर ‘चार्ल्स शोभराज’ची पहिला लूक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss