spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पंजाबी गायक दलेर मेहेंदीला दोन वर्षाचा तुरुंगवास, मानवी तस्करीचा आरोप

पटियाला न्यायालयाने गुरुवारी प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहेंदी याला 2003 सालच्या मानवी तस्करी प्रकरणात दोषी ठरवत दोन वर्षाचा तुरुंगवास भोगण्याची शिक्षा दिली आहे.

पटियाला न्यायालयाने गुरुवारी प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहेंदी याला 2003 सालच्या मानवी तस्करी प्रकरणात दोषी ठरवत दोन वर्षाचा तुरुंगवास भोगण्याची शिक्षा दिली आहे. याप्रकरणी मेहेंदी यांना न्यायालयाने अटक करण्याचे आदेश देखील दिले. हे प्रकरण 2003 सालचे असून याची एकूण 15 वर्षानंतर याची सुनावणी करण्यात आली.

नेमके काय आहे प्रकरण ?

2003 मध्ये एका एफआयआर नुसार, दिलेर मेहेंदी यांनी करिष्मा कपूर आणि तिची आई बबीता यांच्यासोबत अमेरिकेला जात असताना गुजरात मधील तीन मुलींना अमेरिकेला सोडले होते तसेच ऑक्टोबर 1999 मध्ये जुही चावला रविना टंडन आणि जावेद जाफरी यांच्यासोबत जाताना न्यू जर्सी येथे मुलांना बेकायदेशीर सोडले होते. 19 सप्टेंबर 2003 रोजी बाशिष सिंग या व्यक्तीने तक्रार दाखल केल्यानंतर पटियाला पोलिसांनी दहेल आणि शमशेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता त्याचबरोबर आणखीन 25 जणांनी मेहेंदी बंधू विरुद्ध फसवणुकीची तक्रार केली होती.

हेही वाचा : 

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

कोण आहे दलेर मेहेंदी ?

1995 मध्ये दलेर मेहेंदीचा ‘बोलो तारारारा’ हा पहिला अल्बम प्रचंड लोकप्रिय झाला होता. 1998 मध्ये दलेर मेहेंदीचा ‘तुनक तुनक तून’ हा अल्बमही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. बिहारच्या पाटण्यात 18 ऑगस्ट 1967 साली जन्मलेले दलेर मेहेंदी गायक तर आहेतच शिवाय गीतकार, लेखक आणि निर्माता देखील आहे. दलेर मेहेंदीने आपल्या बुलंद आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. दलेर मेहेंदी यांनी आपल्या दमदार आवाजानं प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडलं आहे.

एनडीएच्या राष्ट्रपती उमेदवार द्रौपदी मुर्मू मुंबईत दाखल

Latest Posts

Don't Miss