spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पावसाळ्यात सतत चहा घेऊन ऍसिडिटी वाढतेय ? त्या पेक्षा प्या ही गरमा गरम पेयं

बाहेर हवेत जाणवणाऱ्या गारव्याचा शरीरावर देखील परिणाम होत असतो. तेव्हा शरीर आतून गरम ठेवण्यासाठी अनेकांचा ओढा चहाकडे जास्त वळतो.

पावसाळा सुरू झाला की अनेकांना वेध लागतात ते गरमा गरम भजी आणि वाफाळता चहा पिण्याचे. बाहेर हवेत जाणवणाऱ्या गारव्याचा शरीरावर देखील परिणाम होत असतो. तेव्हा शरीर आतून गरम ठेवण्यासाठी अनेकांचा ओढा चहाकडे जास्त वळतो. दिवसातून तीन वेळा तरी सहज चहाचे घुटके घेतले जातात. पण चहाचे अति सेवन केल्याने त्याचा नंतर त्रासच होतो. सतत चहा पिऊन ऍसिडिटी चा त्रास वाढतो. त्यामुळे संपूर्ण दिवस खराब जातो. तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत चहा व्यतिरिक्त अनेक पेयांची लिस्ट ज्यामुळे तुम्ही चहा चे सेवन कमी करून त्या ऐवजी तुमच्या आहारात या पेयांचा समावेश करू शकता. आणि पावसाळ्यात ते तुमच्यासाठी आरोग्य दायक ही ठरेल.

सूप –
अनेकांना पावसाळ्यात गरम काहीतरी प्यावेसे वाटल्यावर चहा किंवा कॉफी करायला सोपे असल्याने त्यांनाच प्राधान्य दिलं जातं. पण त्याव्यतिरिक्त तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांचे सूप प्यायल्यास ते तुमच्या शरीराला आरोग्यदायक तर ठरतेच आणि त्यामुळे तुम्हाला पोषणही मिळते. सूप मध्ये आलं, लसूण घातल्यास त्याची चव वाढते आणि इन्फेक्शन्सपासून आपला बचाव होतो. पालक, मशरुम, कॉर्न अशा कोणत्याही प्रकारच्या भाज्या शिजवून त्यामध्ये मीठ आणि आवडीनुसार मिरपूड, मिक्स्ड हर्ब्स घातल्यास ते चविष्ट लागते. याशिवाय मार्केट मध्ये अनेक रेडी टू इट सुपचे पॅकेट ही सहज उपलब्ध होतात.

 


हर्बल टी –
फक्त पावसाळ्यातच नाही तर हर्बल टी आरोग्यासाठी केव्हाही चांगलाच. हर्बल टी तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवून पिऊ शकता. आलं, तुळशीची पाने, लवंग, गवती चहा, अर्धा चमचा चहा पावडर, चवीपुरती थोडी साखर. वरील सर्व गोष्टी पाण्यात उकळून ते गाळून प्यावे. ग्रीन टी मधील मासाल्यांमुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. गरमागरम ग्रीन टी प्यायल्याने घसा खवखवण्याचे प्रमाण ही कमी होईल. घशाला आराम मिळेल.

सार –
पावसाळ्यात शरीराला गरम पणा जाणवावा म्हणून तुम्ही तुमच्या जेवणात आमसुलाचे, टोमॅटोचे किंवा अगदी डाळी किंवा कडधान्यांच्या पाण्याचेही सार करु शकता. जीरे आणि लसणाची फोडणी देऊन तिखट, मीठ घातल्यास हे सार पिण्यास अतिशय चविष्ट लागतात. इतकेच नाही तर यामुळे तोंडाला चव येण्यास मदत होते.

 


हळदीचे दूध –
एरव्ही खोकला झाला की आपण हळदीचे गरम दुध पितो. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरीयल गुणधर्म असतात. दूधामध्ये हळद घालून प्यायल्यास त्याचा चांगला फायदा होतो. दुधामधून शरीराला प्रोटीन, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम असे अनेक घटक मिळतात. पावसाळ्याच्या दिवसांत बाहेर फिरताना बऱ्याचदा गार वाऱ्यासोबत आपला संबंध येतो. त्यामुळे घशाला वरचेवर त्रास होतो. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरीयल गुणधर्म असतात. दुधात थोडं केशर थोडी वेलची पावडरही तुम्ही घालू शकतो.

 

Latest Posts

Don't Miss