spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, ठाकरे गट होणार आक्रमक

Maharashtra Assembly Winter Session : महाराष्ट्रामध्ये मागच्या आठवड्यापासून हिवाळी अधिवेशनाला ( Winter Assembly Session) सुरवात झाली आणि आजचा दुसरा आठवडा आहे. हिवाळी अधिवेशन जेव्हा पासून सुरु झालं आहे तेव्हा पासून सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. मागच्या आठवडयाच्या शेवटी सत्ताधाऱ्यांनी शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना सत्ताधाऱ्यांनी दिशा सालियन (Disha Salian) प्रकरणावरून चांगलंच घेतल्याचं दिसत आहे. त्यामुळं ठाकरे गटाची फौज आज नागपुरात दाखल होणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संजय राऊत (Sanjay Raut), मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) नागपुरात (Nagpur) येणार आहेत. यामुळं अधिवेशनाचा दुसरा दिवस वादळी ठरणार आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल नवी मुंबईतील (Navi Mumbai) सभेतून शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde Fadnavis) तसा सूचक इशारा दिला होता. ‘AU’ प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) घेरल्यानंतर आता ठाकरे गटानेही शिंदे फडणवीस सरकारला उत्तर देण्यासाठी रणनिती आखली आहे. संजय राऊतांनी काल बोलताना नागपुरात बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिल्यामुळे आज नागपुरात काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची फौज नागपुरात दाखल होणार आहे. उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर नागपुरात येणार आहेत. गेल्या आठवड्यात दिशा सालियान मृत्यू प्रकरणात शिंदे-फडणवीस सरकारने आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला होता.

संजय राऊत काल बोलताना म्हणाले होते की, नागपूरमध्ये उध्दव ठाकरे आणि मी बरेच बॅाम्ब फोडणार आहोत. आम्ही पाठीत खंजीर खुपसणारे नाही, आमची सेना लेचापेचा, पळपुट्यांची नाही. धमक्या द्या , तडीपारी करा तरीही आमची सेना बुलंद आहे. फेब्रुवारीपर्यंत काहीही करून घ्या. नंतर तुम्ही नसणार. अली बाबा चाळीस चोर फेब्रुवारीनंतर नसणार. आम्ही बलिदान दिले. रक्त सांडले.तुम्ही काय केले टेंडर काढली, भूखंड खाल्ले, असा आरोप त्यांनी केला होता. ४० आमदार गेले असले तरी आता १४० आमदार निवडून आणून आपला मुख्यमंत्री बनवायचा आहे. ज्यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना सोडायचे नाही.अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरून तुमची झोप उडवणार. तुमचे शंभर बाप आले तरी तुम्हाला सोडणार नाही. ज्या कोठडीत मी होतो. त्यात तुम्हाला टाकणार. असा आरोप शिवसेना प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

हे ही वाचा:

चीन कोरोना रुग्ण संख्या लपवतोय ? कोरोना रुग्ण संख्या जाहीर न करण्याचा चीनचा निर्णय

राशी भविष्य – 26 DECEMBER 2022, सातत्याने सकारात्मक विचार…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss