spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ, ‘या’ प्रकरणामुळे कोर्टाने पाठवली नोटीस

आपल्या वक्तव्यावरून नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार आणि महारष्ट्र राज्याचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत बोलल्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली होती. अशातच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर (Nagpur) खंडपीठाने खडे बोल सुनावत नोटीस देखील पाठवली आहे.

उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेनुसार वाशिम जिल्ह्यातील गायरान जमिनीचे एक प्रकरण गेल्या अनेक वर्षांपासून कोर्टात आहे. योगेश खंडारे (Yogesh Khandare) यांनी ३७ एकर ई क्लास जमिनीचा ताबा आपल्याला मिळावा म्हणून कोर्टामध्ये मागणी केली होती, पण स्थानिक दिवाणी न्यायालयासोबतच जिल्हा न्यायालयानेही त्यांचे हे अपील फेटाळून लावले होते. जिल्हा न्यायालयाने १९ एप्रिल १९९४ ला खंडारे यांचे अपिल फेटाळताना कडक शब्दात ताशेरे ओढले होते. खंडारेचा या जमिनीवर कोणताही अधिकार नसताना ते ताबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सरकारी जमीन हडपण्याचा त्यांचा इरादा असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले होते. तेव्हा एका निकालाचाही दाखला दिला होता. (Yogesh Khandare) विरुद्ध जगपाल सिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टाने सार्वजनिक उपयोगाची जमीन कोणालाही व्यक्तिशः किंवा खाजगी संस्थेला देता येत नाही असे सांगितले होते. नंतर याच आदेशाचा आधार घेत महाराष्ट्र सरकारने हे १२ जुलै २०११ ला एक शासन आदेश काढला होता. पण अब्दुल सत्तारांनी सत्तांतराच्या अगदी तोंडावर म्हणजे शिवसेनेतल्या फुटीच्या तोंडावर १७ जून २०२२ रोजी कृषी राज्यमंत्री (Minister of State for Agriculture) असताना ३७ एकर गायरान जमीन योगेश खंडारे नामक व्यक्तीला वाटप करण्याचा निर्णय घेतला.

हा निर्णय घेताना कोणत्याही कायदेशीर बाबींचे पालन केले गेले नाही असा आरोप आहे. याच प्रकरणात वाशिम येथील सामाजिक कार्यकर्ते शाम देवळे (Sham Devle) आणि वकील संतोष पोफळे (Santosh Pohale) यांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. या प्रकरणांमध्ये न्यायमूर्ती सुनील शुक्रे (Sunil Shukre) आणि महेंद्र चांदणी (Mahendra Chandni) यांच्या पिठापुढे सुनावणी झाली. याच प्रकरणात हायकोर्टाने अब्दुल सत्तार यांच्यावर कडक शब्दात ताशेते ओढलेत.

हे ही वाचा : 

Watch Video, चक्क हरणांचा कळप विमानाला घेऊन आकाशात उडाला!

सर्व देवी-देवता हिंसक आहेत, कालिचरण महाराज यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss