spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Watch Video नवदांपत्याच्या Photoshoot मध्ये माकडाने लावली अचानक हजेरी,पत्नीची उडाली तारांबळ

आजकाल आऊटडोअर फोटोशूटचा (Out door photoshoot) ट्रेंन्ड हा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. लग्न करायचं म्हटलं तर त्यामध्ये अनेक गोष्टी येतात. लग्नाआधी जोडप्यांना फोटोशूट करायला आवडते. ज्याला प्री वेडिंग फोटोशूट असे म्हणतात. अश्या फोटोससोत साठी अनेक जोडपे हे वेगवेगळ्या जागेंची निवड करतात. त्यामुळे कपलचे चांगले फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर्सही त्यांना वेगवेगळ्या लोकेशन्सवर नेऊन त्यांचं फोटोशूट करतात. सध्या अशाच एका आऊटडोअर फोटोशूटची चर्चा होताना दिसत आहे. ज्यामध्ये एका जंगलात फोटोशूट करण्यासाठी गेलेल्या जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हे जोडपे फोटोशूट करत असताना अचानक एक माकड त्याच्या पिल्लाला घेऊन जोडप्याच्या मध्ये जाते आणि अचानक नवऱ्याच्या मांडीवर चढे. जे पाहून बाजूला उभ्या असलेल्या नवरीलाही धक्का बसतो.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जोडपे जंगलामध्ये फोटोशूटसाठी आले आहेत. दोघेही रोमॅंटिक अंदाजामध्ये एकमेकांसोबत फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. दरम्यान, एक माकड अचानक आपल्या पिल्लाला घेऊन त्याठिकाणी येते आणि नवऱ्याजवळ जाते. त्यावेळी एक माकडीण आपल्या मुलासोबत येते. ही माकडीण सगळ्यात आधी वधूच्या दिशेने जाते. माकडाला असं अचानक आलेलं पाहून नवरी घाबरते आणि बाजूला सरकते. त्यानंतर हे माकड नवऱ्याच्या मांडीवर चढून आरामात बसते. यानंतर माकडीण नवरदेवाचा हात धरून थेट त्याच्या कडेवर जाऊन बसते. या दरम्यान माकडीण मोठ्या प्रेमानं नवरदेवाला मिठी मारते. विशेष म्हणजे नवरदेवही त्या माकडीणीला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत नाही आणि हसत राहतो. व्हिडिओ पाहून तुम्हाला असं वाटेल की, माकडीण नवरदेवाला म्हणतेय – “चल, हा माझा नवरा आहे.” विशेष म्हणजे या माकडिणीच्या पाठीवर तिचं छोटंसं पिल्लू सुद्धा आहे. कदाचित या माकडालाही फोटोशूट करायचे असेल. यानंतर हे जोडपे माकडासोबतही फोटो काढताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर she_saidyes नावाच्या युजरने शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, “आमच्या व्हिडिओग्राफरला हा शॉट मिळाला यावर विश्वास बसत नाही, किती मस्त दिवस! माकड आणि तिच्या पाठीवर बसलेल्या पिल्लाचा व्हिडिओ खूपच सुंदर आहे.” या व्हिडिओला आतापर्यंत अनेक व्ह्यूज मिळाले असून लोकं यावर भरभरून कंमेंट करत आहेत. लग्नात घडलेल्या किश्यांपैकी हा हास्यस्पद किस्सा . सद्य हा व्हिडिओ झपाटयाने व्हायरल होत आहे.

हे ही वाचा:

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात वॉकिंग करताना पडले, विशेष विमानेने मुंबईला येणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन एम्स रुग्णालयात दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss